छत्री तलावातून काढला २५ पोते प्लास्टिक कचरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2017 11:40 PM2017-10-04T23:40:50+5:302017-10-04T23:41:03+5:30

जागतिक वन्यजीव सप्ताहात आय क्लिन अमरावतीच्या २० सदस्यांनी स्वच्छता अभियान राबवून छत्री तलावातून २५ पोते भरून प्लास्टिक कचरा व निर्माल्य बाहेर काढले.

 25 gross plastic waste removed from the umbrella tank | छत्री तलावातून काढला २५ पोते प्लास्टिक कचरा

छत्री तलावातून काढला २५ पोते प्लास्टिक कचरा

Next
ठळक मुद्देआय-क्लीन अमरावतीचा उपक्रम : जागतिक वन्यजीव सप्ताहाचे औचित्य

अमरावती : जागतिक वन्यजीव सप्ताहात आय क्लिन अमरावतीच्या २० सदस्यांनी स्वच्छता अभियान राबवून छत्री तलावातून २५ पोते भरून प्लास्टिक कचरा व निर्माल्य बाहेर काढले. त्यांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.
महात्मा गांधी जयंती व जागतिक वन्यजीव सप्ताहाचे औचित्य साधून आय क्लिन अमरावती व मेळघाट व्याघ्र प्रकल्पाद्वारे अभियान राबविण्यात आले. यामध्ये छत्री तलावातील कचरा स्वच्छ करण्याचा उपक्रम यशस्वीरित्या पार पाडला. सदस्यांनी छत्री तलावातील पाण्यात उतरून प्लास्टिकच्या पिशव्या गोळा केल्या. गणेश विसर्जन व व दुर्गा विसर्जनाच्या वेळी गोळा झालेले निर्माल्य या उपक्रमांतर्गत बाहेर काढून कचºयाची विल्हेवाट लावण्यात आली. या अभियानात आय- क्लीन अमरावतीचे सदस्य शंतनू पाटील, शिवानी रोडे, अभिषेक कातरे, तुषार गुमळे, तन्मय गुमळे, श्रवण चांडक, गौरी तिखिले, वैष्णवी सालबर्डे, साक्षी पवार, रेवती सोनोन आदिंसह नागरिकांनीही हिरीरीने सहभाग घेतला.

Web Title:  25 gross plastic waste removed from the umbrella tank

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.