२५ लाख झाडे देणार तुम्हाला प्राणवायू!, वनविभागाचे नियोजन

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2024 04:55 PM2024-07-17T16:55:24+5:302024-07-17T16:56:05+5:30

Amravati : जिल्ह्यात 'अमृत वृक्ष आपल्या दारी, एक पेड माँ के नाम' योजना

25 lakh trees will give you fresh air!, planning of forest department | २५ लाख झाडे देणार तुम्हाला प्राणवायू!, वनविभागाचे नियोजन

25 lakh trees will give you fresh air!, planning of forest department

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती :
वनविभागाने नाव संकल्प हाती घेत 'अमृत वृक्ष आपल्या दारी' ही योजना राबवायला सुरुवात केली आहे. ३० सप्टेंबरपर्यंत योजनेत वनमहोत्सव घेण्यात येणार आहे. केंद्र शासनाने 'एक पेड माँ के नाम' योजनेचीही अमरावती जिल्ह्यात प्रभावीपणे अंमलबजावणी केली जात आहे. प्रादेशिक, सामाजिक वनीकरण या दोन्ही यंत्रणांच्या माध्यमातून २५ लाखांपेक्षा जास्त वृक्षलागवड केली जाणार आहे.


शासकीय, निमशासकीय, खासगी आस्थापनांना वृक्षारोपण उपक्रमासाठी वनमहोत्सवातून मोफत रोपे देण्यात येणार आहेत. या रोपांची लागवड करून भविष्यात आपापल्या परिसरात हिरवळ निर्माण करण्याबरोबर निसर्ग संपन्न वातावरणाचा आनंद घेता येणार आहे. त्यासाठी वनविभागाने तयारी सुरू केली आहे. वृक्षारोपण आणि पर्यावरण संवर्धनाचे संस्कार विद्यार्थ्यांवर व्हावेत, रिकाम्या जागेत वृक्षारोपण करावे, यासाठी शाळा, महाविद्यालयांनी मागणी केली आहे.


कोणत्या विभागाला किती उद्दिष्ट?

  • कृषी विभाग : २५०००
  • रेशीम विकास विभाग : १३०००
  • सार्वजनिक बांधकाम विभाग : ३५०००
  • सहकार व पणन : १०५००
  • शालेय शिक्षण : ५००००
  • सामाजिक न्याय : १५०००


झाडांना वाढविण्याची जबाबदारी कोणाची?

  • वनविभागाकडून लागवड केल्यानंतर त्याची निगा राखणे, संगोपनाची जबाबदारी प्रादेशिक, सामाजिक वनीकरणच्या आरएफओंची असणार आहे 
  • शासकीय आस्थापनांनी लागवड केल्यानंतर त्या विभागाचे प्रमुख आणि शाळा, महाविद्यालयात जबाबदारी स्वीकारलेल्या शिक्षक, प्राचार्य व प्राध्यापकांची राहणार आहे.


यंदा २५ लाख वृक्षलागवडीचे उद्दिष्ट
वनविभागाच्या चांदूर रेल्वे, वडाळी, मोर्शी, परतवाडा, वरूड वनपरिक्षेत्रातील प्रादेशिक व सामाजिक वनीकरण विभागाने २५ लाख वृक्षलागवडीचे उद्दिष्ट ठेवले आहे. परतवाडा वनपरिक्षेत्राच्या कार्यक्षेत्रात मेळघाटच्या पायथ्याजवळ वनक्षेत्र येते. आरएफओंना त्यांच्या कार्यक्षेत्रात वृक्षलागवडीचे टार्गेट दिले आहे.


गतवर्षी लावली १० लाख
गतवर्षी १० लाख वृक्षांची लागवड करण्यात आली होती. मात्र, अपुऱ्या पावसाने काही रोपे मृतावस्थेतद्य गेल्याने याचा फटका वृक्षलागवडीला बसला. त्यामुळे ३० टक्केच वृक्षलागवड झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.


वनमहोत्सवासह केंदम व राज्य शासनाच्या योजनांची अंमलबजावणी नेमक्या पद्धतीने पार पाडण्यासाठी सातत्याने समन्वय सुरु ठेवला जाणार आहे. तसेच जिल्हा प्रशासनाच्यावतीने बांबू लावगड केली जाणार आहे. 'मनरेगा'अंतर्गत येणारे घटक व संबंधित ग्रामपंचायतीच्या मदतीने लागवड जपली जाणारा आहे.
- सौरभ कटियार, जिल्हाधिकारी
 

Web Title: 25 lakh trees will give you fresh air!, planning of forest department

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.