अमरावतीमध्ये पुन्हा २५ संक्रमित; दोन रॅपिड टेस्ट सेंटर सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2020 08:26 PM2020-07-08T20:26:42+5:302020-07-08T20:26:50+5:30
हायरिस्कच्या व्यक्तींचे तातडीने अहवाल मिळण्यासाठी शहरात दोन रॅपिड टेस्ट सेंटर सुरू करण्यात आले.
अमरावती : विद्यापीठाच्या लॅबद्वारे बुधवारी दोन टप्प्यांत २५ पॉझिटिव्ह अहवाल प्राप्त झाल्याने जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांची संख्या ७५० वर पोहोचली आहे. नव्या भागात कोरोनाचा शिरकाव हा चिंतेचा विषय असताना हायरिस्कच्या व्यक्तींचे तातडीने अहवाल मिळण्यासाठी शहरात दोन रॅपिड टेस्ट सेंटर सुरू करण्यात आले.
प्राप्त अहवालात जिल्हा परिषदेतील ४२ वर्षीय कर्मचारी व शेगाव नाका येथे ४३ वर्षीय पुरुष, मौलापुºयात २६ व ४८ वर्षीय, गाडगेनगरात ३५ महिला, धामणगाव रेल्वे येथील क्वारंटाईन सेंटरमधील ८ वर्षीय बालक, २८ वर्षीय पुरुष व ३५ वर्षीय महिला, अचलपूर येथे बुंदेलपुºयात २९ वर्षीय पुरुष व खोलापूर येथे ४६ वर्षीय महिलेचा समावेश आहे.
सायंकाळचे अहवालात भीमनगरात ४४ व ७० वर्षीय, श्रीकृष्ण पेठ येथे २३ वर्षीय, अनूपनगरात २९ वर्षीय, दर्यापूर येथील क्वारंटाईन सेंटरमधील २१ वर्षीय, चपराशीपुºयातील ५७ वर्षीय, कॅम्प येथे २८ व ५६ वर्षीय पुरुषाचा अहवाल पॉझिटिव्ह आलेला आहे. याशिवाय महेंद्र कॉलनीत ५७ वर्षीय, कांतानगरात ३५ वर्षीय, रामपुरी कॅम्पमध्ये २९ व ३७ वर्षीय व अशोक नगरात ५५ वर्षीय महिलेचा तसेच भीमनगरात ७ वर्षीय, रामपुरी कॅम्पमध्ये ६ बालिकेचा अहवाल पॉझिटिव्ह आलेला आहे.