कॅलिफोर्नियातील २५ टक्के संत्राबागा ‘व्हेंटिलेटर’वर

By admin | Published: June 30, 2017 12:09 AM2017-06-30T00:09:24+5:302017-06-30T00:09:24+5:30

जून महिना उलटून गेला तरी पावसाने पाहिजे तशी हजेरी न लावल्याने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.

25 percent of California's 'Orange Ventilators' on the Orange Bag | कॅलिफोर्नियातील २५ टक्के संत्राबागा ‘व्हेंटिलेटर’वर

कॅलिफोर्नियातील २५ टक्के संत्राबागा ‘व्हेंटिलेटर’वर

Next

आता अस्मानी संकट : मृग बहार हातचा गेला, संत्रा उत्पादक हैराण
लोकमत न्यूज नेटवर्क
वरूड : जून महिना उलटून गेला तरी पावसाने पाहिजे तशी हजेरी न लावल्याने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. तालुक्यातील २१ हजार ५०० हेक्टर जमिनीवरील संत्रा बागांपैकी २५ टक्के बागा सुकण्याच्या मार्गावर असून येथील संत्रा उत्पादक हैराण झाले आहेत.
तालुक्यातील ९ सिंचन प्रकल्पांना बुड लागले आहे. अद्याप मृगबहार सुद्धा फुटलेला नाही. जानेवारी, फेब्रुवारीमध्ये आलेल्या संत्राफळांना गळती लागल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. संत्रा उत्पादकांना शासनाने त्वरित आर्थिक मदत देण्याची मागणी केली जात आहे. तालुक्याती प्रमुख प्र्रकल्पांपैकी एक शेकदरी प्रकल्पाची पूर्ण जलसंचयक्षमता ५१४.६५ मीटर असून ओलीत क्षमता १ हजार ३४० हेक्टर, पुसली प्रकल्पामध्ये पूर्ण जलसंचय क्षमता १००.६० मीटर असून ओलितक्षमता ३०९ हेक्टर, वाई प्रकल्पामध्ये पूर्ण जलसंचयक्षमता ४६१.७७ मीटर असून ओलितक्षमता ३७० हेक्टर आहे.
सातनूर प्रकल्पाची पूर्ण जलसंचयक्षमता ५००.७५ मीटर तर ओलीतक्षमता २९९ हेक्टर, पंढरी प्रकल्पामध्ये पूर्ण जलसंचय क्षमता ४४८.३० मीटर तर ओलीत क्षमता १५३ हेक्टर, जामगाव प्रकल्पाची पूर्ण जलसंचय क्षमता ४८०.५० मीटर असून ओलितक्षमता १२१ हेक्टर, नागठाणा प्रकल्पामध्ये पूर्ण जलसंचयक्षमता ४८१.६० मीटर असून ओलीत क्षमता २१२ हेक्टर, जमालपूर प्रकल्पामध्ये पूर्ण जलसंचय क्षमता १०४.१० मिटर असून ओलीत क्षमता १२२ हेक्टर, बेलसावंगी प्रकल्पामध्ये पूर्ण जलसंचय क्षमता १०४.१० मीटर असून ओलीत क्षमता १२१ हेक्टर, लोणी धवलगिरी प्रकल्पाची ओलित क्षमता ६३६ हेक्टरची आहे. वघाळ बंधारा असून ओलीत क्षमता ४९६ हेक्टर आहे. आॅगस्ट २०१६ मध्ये या प्रकल्पांत १०० टक्के जलसाठा होता. मात्र, त्यानंतर पावसाने दडी दिल्याने तापमानात सुद्धा वाढ झाल्याने जलसाठा कमी होऊन मे महिन्यात हे सर्व प्रकल्प कोरडे पडले आहेत. यामुळे तालुक्यात सिंचनासह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आला. तालुक्यात १४ पाणीवापर संस्था असून रबी हंगामाकरिता सिंचन प्रकल्पातून पाणीवापर संस्थांना पाणी द्यावे लागते. आतार नद्यांनासुद्धा पाणी सोडण्याची वेळ आली आहे.
यावर्षी केवळ पाईपलाईनव्दारे सिंचन करणाऱ्या कपिलेश्वर पाणीवापर संस्था वगळता इतर संस्थांना पाणीवाटप बंद करण्यात आले. यातच तापमानसुद्धा वाढल्याने संत्राबागा सुकल्या आहेत. मृग बहारानेसुद्धा पाठ दाखविल्याने संत्रा उत्पादकांचे मोठे नुकसान झाले. यामुळे तालुक्यातील २५ टक्के संत्राबागा सुकल्या.
जामगाव, पिपलागढ, कारली, महेंद्री, धनोडी, पुसला, लिंगा, शेंदूरजनाघाट, टेंभुरखेडा, बारगाव, बेनोडा मांगरुळी, लोणी, राजुराबाजार, हातुर्णा, आमनेरसह आदी परिसराचा समावेश आहे. संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना संत्रा बागा सुकल्याचे तसेच आणि मृग बहार फुटला नाही. यातच जानेवारी फेब्रुवारीमध्ये अतितापमानात आंबिया संत्राबहारसुध्द्धा ५० ते ६० टक्के गळाला. शासनाने सर्वेक्षण करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी संत्रा उत्पादक शेतकऱ्यांनी केली आहे.

Web Title: 25 percent of California's 'Orange Ventilators' on the Orange Bag

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.