महापालिकेत २५ शिपायांना पदोन्नती मिळणार

By admin | Published: September 8, 2015 12:18 AM2015-09-08T00:18:26+5:302015-09-08T00:18:26+5:30

महापालिका आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी कर्मचाऱ्यांना न्याय देण्याची भूमिका घेतली असताना आता २५ शिपायांना पदोन्नती दिली जाणार आहे

25 soldiers will get promotions in the municipal corporation | महापालिकेत २५ शिपायांना पदोन्नती मिळणार

महापालिकेत २५ शिपायांना पदोन्नती मिळणार

Next

आयुक्तांचा निर्णय : सामान्य प्रशासन विभाग लागला कामाला
अमरावती : महापालिका आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी कर्मचाऱ्यांना न्याय देण्याची भूमिका घेतली असताना आता २५ शिपायांना पदोन्नती दिली जाणार आहे. काही वर्षांपासून शिपायांची रखडलेल्या पदोन्नतीचा मार्ग सुकर झाला आहे.
गत आठवड्यात आयुक्तांनी कनिष्ठ लिपिकांना पदोन्नती दिली आहे. मात्र शिपायांच्या पदोन्नतीची फाईल अद्यापही धूळखात असल्याने शिपायांना न्याय देण्यासाठी प्रशासनाने साकारात्मक भूमिका घेतली. महापालिकेत कार्यरत शिपाई पदोन्नतीस पात्र आहे, अशा शिपायांचे प्रस्ताव त्वरेने सामान्य प्रशासन विभागाने सादर करावे, अशा सूचना उपायुक्त विनायक औगड यांनी केल्या आहेत. त्यानुसार येत्या महिन्याभरात शिपायांना पदोन्नती दिली जाणार आहे.
सुमारे २५ शिपाई हे पदोन्नतीस पात्र असून त्यांची वर्गवारी करुन त्यांना पदोन्नती दिली जाणार आहे. काही वर्षांपासून कर्मचाऱ्यांच्या रखडलेल्या पदोन्नती आता मार्गी लागत असल्याने कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहावयास मिळत आहे.

Web Title: 25 soldiers will get promotions in the municipal corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.