२५० पोलिसांच्या बदल्या
By admin | Published: April 25, 2015 12:17 AM2015-04-25T00:17:22+5:302015-04-25T00:17:22+5:30
पाच वर्ष सेवा पूर्ण झालेल्या २५० पोलीस कर्मचाऱ्यांचे बदलीचे आदेश प्रभारी पोलीस आयुक्त सोमनाथ घार्गे यांनी शुक्रवारी काढले.
पाच वर्षे सेवा पूर्ण : कर्मचाऱ्यांची रुजू होण्यासाठी धावपळ
अमरावती : पाच वर्ष सेवा पूर्ण झालेल्या २५० पोलीस कर्मचाऱ्यांचे बदलीचे आदेश प्रभारी पोलीस आयुक्त सोमनाथ घार्गे यांनी शुक्रवारी काढले. परिणामी पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये सेवत रुजू होण्यासाठी धावपळ सुरु झाली आहे. यात महापालिकेच्या अतिक्रमण विभागालाही स्वतंत्र १० पोलीस कर्मचारी देण्यात आले आहे.
पोलीस आयुक्तालयातील आस्थापना मंडळाच्या शिफारशीनुसार विविध विभाग तसेच १० पोलीस ठाण्यांतर्गत २५० कर्मचाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत. यामध्ये पोलीस उपनिरीक्षक, सहायक पोलीस उपनिरीक्षक, पोलीस हवालदार, पोलीस नाईक, शिपायांचा समावेश आहे. त्यामध्ये वाहतूक शाखेच्या ५३ पोलीस कर्मचाऱ्यांना इतर ठिकाणी स्थांनातरण करण्यात आले आहे. यामध्ये पूर्व झोनमधील २३ व पश्चिम झोनच्या ३० पोलीस कर्मचाऱ्यांचा सहभाग आहे. या व्यतिरीक्त पोलीस मुख्यालयाचे ३२, राजापेठ २८, वलगांव २५, बडनेरा १९, गाड़गेनगर १८, नागपुरी गेट १७, नियंत्रण कक्षाचे१६, फ्रेजरपुरा १२, कोतवाली १०, विशेष शाखा ७, महिला सेल ५, खोलापुरी गेट ३, नांदगांवपेठ २, गुन्हे शाखा २ आणि महापालिका अतिक्रमण विभागात १० पोलीस अशा एकूण २५० कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.
महापालिका अतिक्रमण विभागाला १० पोलीस कर्मचारी
महापालिका अतिक्रमण विभागाला शहरातील अतिक्रमण हटविताना नागरिक विरोध दर्शवितात. अशा प्रसंगी पोलिसांची मदत घेणे आवश्यक असते. शासनाकडून १० पोलीस कर्मचाऱ्यांची पदे मंजूर असल्यामुळे अतिक्रमण विभागाला स्वतंत्र पोलीस कर्मचारी देण्यात आले आहे. या पोलिसांची जबाबदारी महापालिका सांभाळणार आहे.
पाच वर्ष सेवा पूर्ण झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. बदल्याचे आदेश प्राप्त होताच २४ तासांच्या आत सेवेवर रुजू होण्याचे आदेश देण्यात आले आहे.
-सोमनाथ घार्गे,
प्रभारी पोलीस आयुक्त.