२,५२२ पदे रिक्त, कशी येणार कामकाजात गती?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2021 04:10 AM2021-06-24T04:10:22+5:302021-06-24T04:10:22+5:30
अमरावती : कामकाजात गती यावी यासाठी प्रशासनाद्वारा विविध उपाययोजना केल्या जात असल्या तरी यात फारसे साध्य झाले नसल्याचे ...
अमरावती : कामकाजात गती यावी यासाठी प्रशासनाद्वारा विविध उपाययोजना केल्या जात असल्या तरी यात फारसे साध्य झाले नसल्याचे आतापर्यंत दिसून आले आहे. जिल्ह्यात शासनाच्या २६ विभागात लिपिक व चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची तब्बल २,५२२ पदे रिक्त असल्यामुळे कामकाजाला खिळ लागलेली आहे. यात कंत्राटीचा उतारा काढण्यात आला असला तरी नियमित कर्मचाऱ्यांची व अनुकंपामध्ये नियुक्ती रखडल्या असल्याचे दिसून येते.
कुठल्याही विभागात वर्ग ‘क’ व ‘ड’मधील कर्मचारी हा त्या प्रशासनाचा कणा ठरला आहे. जिल्ह्यात राज्य शासनाचे २६ कार्यालये आहेत. यामध्ये लिपीकवर्गीय श्रेणीमधील ७,९९१ व चतुर्थ श्रेणीमधील ५८७ पदे मंजूर आहेत. प्रत्यक्षात लिपीकर्वगीयमध्ये १,३३७ व चतुर्थ श्रेणीमध्ये ११६५ पदे रिक्त असल्याची धक्कादायक माहिती समोर आलेली आली. यामध्येही महत्वाचे असणाऱ्या अनुकंपा तत्वावर २४२ पदर भरावयाची आहे. आतापर्यत ‘क’ वर्गात ९९ तर ‘ड’ वर्गात ६४ पदे असे एकूण १६३ पदे भरण्यात आली यात समावेश आाहे. अद्याप लिपिकवर्गीय मध्ये ३० तर चतुर्थश्रेणीत २४ पदे भरण्यात आल्याचा शासकीय अहवाल आहे.
प्रशासनाच्या कामकाजात गती येण्यासाठी प्रतीक्षा यादीनुसार पात्र उमेदवारांना वेळेत नियुक्ती मिळाली पाहिजे. सर्व विभागांतील रिक्त पदांची माहिती, प्रतीक्षा सूची अद्ययावत असणे आवश्यक आहे. यासाठी स्वतंत्र सॉफ्टवेअर विकसित करावे व प्रक्रिया पारदर्शीपणे राबवावी, असे निर्देश पालकमंत्र्यांनी मंगळवारी सर्व विभागांना दिले आहेत.
बॉक्स
आज्ञावली विकसित करणार
शासनाच्या विविध विभागांमध्ये अनुकंपा तत्त्वावरील नियुक्त्यांची प्रक्रिया वेळेत पूर्ण होणे आवश्यक असते. याकरीता ही प्रक्रिया पारदर्शी व गतीने पूर्ण होण्यासाठी याबाबतच्या अद्ययावत माहितीची आज्ञावली (सॉफ्टवेअर) विकसित करण्यात यावी, असे निर्देश पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी सर्व विभागप्रमुखांना मंगळवारी दिले आहेत.
बॉक्स
कलेक्ट्रेटमध्ये १३५, महापालिकेत ६९७ पदे रिक्त
जिल्हाधिकारी कार्यालयात लिपीकवर्गीय प्रवर्गात ६५ तर चतुर्थ श्रेंणीमध्ये ६५ पदे रिक्त आहेत. याशिवाय अनुकंपाची पदे निरंक आहेत. महापालिका प्रशासनात लिपिकवर्गीयांमध्ये १४५ तर चतुर्थ श्रेंणीमध्ये तब्बल ५५१ पदे रिक्त आहेत. कंत्राटी पद्धतीने काही कर्मचारी घेवूण कामकाजाला गती देण्याचा प्रयत्न होत आहे. अनुकंपामध्ये अद्याप सात पदे भरण्यात आालेली नाहीत.
बॉक्स
सीपी कार्यालयात १६०, एसपी कार्यालयात १२० पदे रिक्त
माहितीनूसार पोलीस आयुक्त कार्यालयात पोलीस शिपायांची ४० व एसपी कार्यालयात १२० पदे रिक्त आहेत. एसपी कार्यालयात अनकंपामध्ये ‘ड’ श्रेणीत चार पदे रिक्त आहेत. याशिवाय सहसंचालक लेखा कोषागार विभागात लेखापाल व लिपीक वर्गात ३० व अनुकंपामध्ये दोन पदे रिक्त आहेत. प्रादेशिक परिवहन विभागात दोन्ही प्रवर्गात ३२ पदे रिक्त आहेत.
बॉक्स
झेडपीत ११९, भुमी अभिलेखमध्ये २४७ पदे रिक्त
जिल्हापरिषदेत लिपीक वर्गियात १०० व चतुर्थ श्रेणीमध्ये १९ पदे रिक्त आहेत, उपसंचालक भूमी अभिलेखमध्ये लिपीकर्वगीय १०२ व चतुर्थश्रेणीत १४५ पदे रिक्त आहेत. सहायक अधीक्षक अभियंता उर्ध्व वर्धा सिंचन मंडळात लिपीकवर्गीयमध्ये १२१ व चतुर्थ श्रेणीमध्ये ६१ पदे रिक्त आहेत. मुख्य वनसंरक्षक (प्रादेशिक)मध्ये लिपीक १७१ व चतुर्थ श्रेणीमध्ये १९ पदे रिक्त आहेत.
बॉक्स
शिक्षण उपसंचालक कार्यालयात २४५ पदे रिक्त
शिक्षण उपसंचालक कार्यालयात लिपीकवर्गीयमध्ये २३४ व चतुर्थ श्रेणीमध्ये ११ व अनुकंपामध्ये पाच पदे रिक्त आहेत. याशिवाय अधिक्षक अभियंता सार्वजिनक मंडळात दोन्ही प्रवर्गात ३३, सहसंचालक उच्चशिक्षणमध्ये ४२, मजीप्रामध्ये ९९, राज्य उत्पादन शुल्कमध्ये ६, सहजिल्हा निबंधकमध्ये ८, सीएसमध्ये ८५,व विभागिय माहिती कार्यालयात २० पदे रिक्त आहेत.
पाईंटर
क व ड प्रवर्गाची सद्यस्थिती
एकूण पदे : ८,५७८
रिक्त पदे : २,५२२
अनुकंपात भरावयाची : २४२
अनुंकपांत नियुक्ती : १६३