२६ ग्रामसेवक आदर्श पुरस्काराने सन्मानित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 2, 2019 10:43 PM2019-03-02T22:43:52+5:302019-03-02T22:44:08+5:30
जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागामार्फत दरवर्षी दिल्या जाणाऱ्या सन २०१५-१६ आणि २०१६-१७ या दोन वर्षातील २६ जणांना आदर्श ग्रामसेवक पुरस्काराने तर ३ विस्तार अधिकाऱ्यांना आदर्श विस्तार अधिकारी पुरस्काराने शनिवारी सन्मानित करण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागामार्फत दरवर्षी दिल्या जाणाऱ्या सन २०१५-१६ आणि २०१६-१७ या दोन वर्षातील २६ जणांना आदर्श ग्रामसेवक पुरस्काराने तर ३ विस्तार अधिकाऱ्यांना आदर्श विस्तार अधिकारी पुरस्काराने शनिवारी सन्मानित करण्यात आले.
जिल्हा परिषदेच्या डॉ. पंजाबराव देशमुख सभागृहात आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद अध्यक्ष नितीन गोंडाणे हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून शिक्षण सभापती जयंत देशमुख, सीईओ मनीषा खत्री, अतिरिक्त मुख्यकार्यकारी अधिकारी विनय ठमके, पंचायत विभागाचे डेप्युटी दिलीप मानकर, नारायण सानप, माया वानखडे, बीडीओ दीपक पतंगराव, ग्रामसेवक युनियनचे विभागीय उपाध्यक्ष बबनराव कोल्हे, जिल्हाध्यक्ष कमलाकर वनवे, सरचिटणीस आशिष भागवत उपस्थित होते. यावेळी २०१५-१६ मधील १२ आणि २०१६-१७ मध्ये १४ याप्रमाणे २६ जणांचा व तीन विस्तार अधिकाºयांना उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल शाल, श्रीफळ व सन्मान चिन्हाने मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. कार्यक्रमाला नितीन गोंडाणे, जयंत देशमुख, डेप्युटी सीईओ नारायण सानप, ग्रामसेवक युनियनचे अध्यक्ष कमलाकर वणवे आदींनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. प्रास्ताविक दिलीप मानकर, संचालन प्रदीप बद्रे व आभार प्रदर्शन दीपक पतंगराव यांनी केले. यावेळी विजय उपरीकर, जयंत गंधे अशोक थोटांगे, दीपक बांबटकर, माडीवाले, जयंत गोफने, राजू ठाकरे, नीलेश देशमुख, सुदेश तोटेवार, उद्धव वानखडे, राजू ठाकरे, संजय पोहेकर, श्रावण अंभोरे, रवी हेलोडे, सुनील शिराळकर यांनी सहकार्य केले.
हे ठरले पुरस्काराचे मानकरी
जिल्हा परिषद पंचायत विभागातर्फे सन २०१५-१६ मधील आदर्श ग्रामसेवक पुरस्कार प्राप्त करणाºयांमध्ये विनोद मनवर (मोर्शी), माया डोईफोडे (चिखलदरा), योगेश्र्वर उमप (अचलपूर), सुरेंद्र वानखडे (धामणगाव रेल्वे), संजय चव्हाण (भातकुली), अजय देशमुख (चांदूर बाजार), नरेंद्र मेहरे (अमरावती), साहेबराव वानखडे (दर्यापूर), भाष्कर गिद (चांदूर रेल्वे), राजेश भडांगे (वरूड), सुनील मोंढे (तिवसा), सी.व्ही. नवले (अंजनगाव सुर्जी) यांचा समावेश आहे. सन २०१६-१७ मधील पुरस्कारप्राप्त ग्रामसेवकांमध्ये नीलेश सूर्यवंशी (मोर्शी), नरेंद्र काळे (चिखलदरा), वैशाली कोठवार (अचलपूर), अनिल गावीत (धामणगाव रेल्वे), अमोल आडे (धारणी), अनिता जोल्हे (भातकुली), किशोर उल्हे (चांदूर बाजार), सुनील तिडके (अमरावती), आर.एम.लोखंडे (दर्यापूर), विलास ढेंबरे (चांदूर रेल्वे), भूषण बान्ते (तिवसा), किशोर सानप (नांदगाव खंडेश्र्वर), पी.बी.भुंबरकर (अंजनगाव सुर्जी), जी.एन.भांगे (वरूड) यांचा गौरव करण्यात आला. याशिवाय उकृष्ट विस्तार अधिकारी पुरस्काराने विठ्ठल जाधव, पांडुरंग उलेमाले आणि सुधाकर भिमगडे यांचा सन्मान करण्यात आला.