मोर्शी तालुक्यात २६ गावांना कोरड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2019 01:00 AM2019-05-19T01:00:23+5:302019-05-19T01:02:19+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मोर्शी : तालुक्यातील एकूण १६६ गावांपैकी २६ गावांत तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. त्या गावांमध्ये सात ...

26 villages in Morshi taluka dry | मोर्शी तालुक्यात २६ गावांना कोरड

मोर्शी तालुक्यात २६ गावांना कोरड

googlenewsNext
ठळक मुद्दे७० गावे पाणी पुरवठा योजना बंद। सहा गावात टँकर, इतर गावातील सुविधांचे काय?

लोकमत न्यूज नेटवर्क
मोर्शी : तालुक्यातील एकूण १६६ गावांपैकी २६ गावांत तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. त्या गावांमध्ये सात दिवसाआड पाणीपुरवठा होत असून, सहा गावांमध्ये शासकीय टँकर लावण्यात आले आहेत. प्रशासनाने ४४ विहिरी अधिग्रहीत केल्यात. लेहेगाव, सावरखेड, आसोना, वाघोली, पोरगव्हान, आखतवाडा या सहा गावांमध्ये टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे.
तालुक्यातील १० गावांमध्ये ८ ते १० दिवसाआड, तर काही ग्रामपंचायतीकडून चार ते पाच दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. तालुक्यातील ७० गावे पाणीपुरवठा योजना बंद पडल्याने पाणीटंचाई जहाल झाली. गावोगावी आंदोलने उभारली गेली. मात्र, प्रशासनाचे नियोजन टँकरपुरते मर्यादित राहिले. सध्या मोर्शी तालुक्यातील उतखेड, भिलापूर, उमरखेड, शिरजगाव, खेड, डोमक, धानोरा, आखतवाडा, पोरगव्हाण, वाघोली, लेहगांव, आसोना, पिंपळखुटा (लहान), इनापूर, सायवाडा, अंबाडा, पाळा, रिध्दपूर, बोडना, बेलोना, वºहा, कमळापूर, निंभोरा, लाखारा, आष्टगाव, शिरखेड, सावरखेड, गोराळा, ब्राम्हणवाडा, कोळविहीर या गांवात तीव्र पाणी टंचाई भासत आहे. गावकऱ्यांमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी हाहाकार उडाला आहे.
दोन वर्षांपासून अत्यल्प पाऊस कोसळल्याने तालुका कोरड्या दुष्काळास सामोरे जात आहे.
पाणीटंचाईमुळे जनजीवन प्रभावित झाले आहे. गावाची तहान भागवणारे तलाव, विहिरी, बोअरवेल, हँडपंप कोरडे पडले आहेत. प्रशासनाकडे कायमस्वरूपी उपाययोजनांचे नियोजन नसल्याने महिलांना दोन किलोमीटर अंतराहून पाणी आणावे लागत आहे.

पाणी टंचाईवर मात करण्यासाठी विहिरी अधिग्रहीत करण्यात आल्या. मागणीप्रमाणे शासकीय टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. आणखी काही गावांमध्ये आगामी काळात टँकर पुरविले जातील. ग्रामस्थांची पाण्यासाठी होणारी वनवन थांबविण्यासाठी तहसीलने आराखडा बनविला आहे.
- गणेश माळी,
तहसीलदार, मोर्शी

Web Title: 26 villages in Morshi taluka dry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.