कागदोपत्री प्लॉट दाखवून २६.८५ लाखांनी फसवणूक, दर्यापूरमधील प्रकार
By प्रदीप भाकरे | Published: February 25, 2024 10:18 PM2024-02-25T22:18:22+5:302024-02-25T22:18:32+5:30
दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल
अमरावती: दर्यापूर येथे कागदोपत्री प्लॉट दाखवून तिघांची तब्बल २६.८५ लाखांनी फसवणूक करण्यात आली. दि. २४ जानेवारी २०२३ ते २४ सप्टेंबर २०२३ रोजीदरम्यान ती फसवणुकीची मालिका चालली. याप्रकरणी, दर्यापूर पोलिसांनी दि. २४ फेब्रुवारी रोजी एका महिलेच्या तक्रारीवरून आरोपी शुभम राजू उटाळे (२५) व धीरज धनराज यादव (दोघेही रा. दर्यापूर)
तक्रारीनुसार, आरोपी शुभम उटाळे व त्याचा साथीदार धीरज यादव यांनी कोणताही प्लॉट नसताना बॉन्डवर खोटी व बनावट ईसारचिठ्ठी तयार केली. तथा फिर्यादी महिलेसह तिच्या मूर्तिजापूर येथील नातेवाईकाकडून दीड लाख रुपये, फिर्यादी महिलेचे जावई संतोष यादवराव बुरे (रा. मूर्तिजापूर) यांचेकडून ४.८० लाख रुपये, गणेश डाहाळे यांचेकडून ३.५० लाख रुपये तर, प्रवीण सुरेश कनोजे (रा. नागपूर) यांच्याकडून ६.३० लाख रुपये, अक्षय सुभाष डाहाळे (रा. अमरावती) यांच्याकडून ४.२५ लाख रुपये घेतले. मात्र इसार झाल्यानंतर, पैसे घेतल्यानंतर प्लॉट घेऊन न देता आरोपींनी सर्वांची फसवणूक केली. दोन्ही आरोपींनी आपल्यासह आपल्या नातेवाइकांना प्लॉट घेऊन देतो म्हणून प्रत्यक्षात कोणताही प्लॉट नावावर करून न देता बॉन्डवर खोटा ईसार केला तथा एकूण २६ लाख ८५ हजारांनी फसवणूक केल्याची तक्रार महिलेने नोंदविली.