मोर्शी उपजिल्हा रुग्णालयातून २७५ रुग्ण कोरोनामुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2021 04:13 AM2021-05-27T04:13:51+5:302021-05-27T04:13:51+5:30

मोर्शी : स्थानिक उपजिल्हा रुग्णालयातील कोविड आरोग्य केंद्रातून आतापर्यंत २७५ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. वैद्यकीय अधीक्षक विजय ...

275 patients discharged from Morshi Sub-District Hospital | मोर्शी उपजिल्हा रुग्णालयातून २७५ रुग्ण कोरोनामुक्त

मोर्शी उपजिल्हा रुग्णालयातून २७५ रुग्ण कोरोनामुक्त

Next

मोर्शी : स्थानिक उपजिल्हा रुग्णालयातील कोविड आरोग्य केंद्रातून आतापर्यंत २७५ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.

वैद्यकीय अधीक्षक विजय कळसकर यांच्या मार्गदर्शनाखाली कोविड इन्चार्ज सचिन कोरडे व त्यांची चमू कोविड आरोग्य केंद्रात अविरत कार्य करीत आहे. सर्व कोविड रुग्णांना डॉ. रोशन बालबंशी, आरोग्य सहायक विनायक नेवारे, विनय शेलुरे, आरोग्य कर्मचारी सुजित वानखडे, अंजुमा खान, सुलू सलामे, वैष्णवी जोशी, शिवानी हटवार, ज्ञानेश्वर कोरडे, अंकिता हिवरे, राजश्री धुर्वे, आकाश जवंजाळकर, नौशाद हबीब शाह हे सेवा देत आहेत. कोविड रुग्णांना चहा, नाष्टा, जेवण व आवश्यक औषधोपचार वेळेच्या वेळी देण्यात येत आहे. रुग्णांना तणावमुक्त ठेवून डॉक्टर व सर्व स्टाफ खूप मोलाची कामगिरी बजावत आहेत.

Web Title: 275 patients discharged from Morshi Sub-District Hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.