जिल्ह्यातील २७९ विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2021 04:16 AM2021-08-22T04:16:12+5:302021-08-22T04:16:12+5:30
अमरावती : एप्रिल महिन्यात घेण्यात आलेल्या राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थी शिष्यवृत्ती योजना परीक्षेचा निकाल १८ ऑगस्ट रोजी जाहीर ...
अमरावती : एप्रिल महिन्यात घेण्यात आलेल्या राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थी शिष्यवृत्ती योजना परीक्षेचा निकाल १८ ऑगस्ट रोजी जाहीर झाला. यात जिल्ह्यातील विविध शाळांमधील २७९ विद्यार्थी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होऊन शिष्यवृत्ती पात्र ठरले. आर्थिक मागास विद्यार्थ्याकडून प्रज्ञावान विद्यार्थ्यांचा शोध घेऊन त्यांच्या प्रज्ञाची जोपासना तसेच त्यांचे बारावीपर्यंत शिक्षण पूर्ण व्हावे, हा यामागील उद्देश आहे. ही परीक्षा ६ एप्रिलला घेण्यात आली. संबंधित विद्यार्थ्यांना इयत्ता बारावीपर्यंत प्रतिमहिना १००० रुपयाप्रमाणे चार वर्षे ४८ हजार रुपये शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. सदर रक्कम विद्यार्थ्याच्या थेट बँक खात्यात जमा केली जाणार आहे.
बॉक्स
दरमहा एक हजार रुपये शिष्यवृत्ती
प्रज्ञावान विद्यार्थ्यांना दरमहा शिष्यवृत्तीच्या स्वरुपात आर्थिक मदत करण्यात येते. ही शिष्यवृत्ती बारावीपर्यंत मिळते. दरमहा एक हजार रुपये याप्रमाणे वार्षिक १२ हजार रुपयांची शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्यांना दिली जाते.