२७ व्या सब ज्युनियर राष्ट्रीय सॉफ्टबॉल चॅम्पियनशिपला प्रारंभ
By admin | Published: June 2, 2014 12:38 AM2014-06-02T00:38:36+5:302014-06-02T00:38:36+5:30
येथील सॉफ्टबॉल असोशियनच्यावतीने रविवारी २७ व्या अखिल भारतीय सबज्युनियर सॉफ्टबॉल
अमरावती : येथील सॉफ्टबॉल असोशियनच्यावतीने रविवारी २७ व्या अखिल भारतीय सबज्युनियर सॉफ्टबॉल चॅम्पियनशिपला प्रारंभ झाला. या स्पर्धेत देशभरातील २५ राज्यातील मुला-मुलींची चमू दाखल झाली आहे. येथील विभागीय क्रीडा संकुल परिसरात १ ते ६ जून दरम्यान आयोजित चॅम्पियनशिपचे उद्घाटन विभागीय आयुक्त डी.आर. बनसोड यांच्या हस्ते करण्यात आले. बनसोड यांच्या हस्ते क्रीडांगणावर नारळ फोडून विधीवत उद्घाटन करण्यात आले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून निवासी उपजिल्हाधिकारी तेजुसिंग पवार, प्राचार्य स्मिता देशमुख, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत पाटील, सॉफ्ट बॉल असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष धर्मा चौंडणकर, सरचिटणीस सूरजसिंग कालेत, क्रीडा उपसंचालक जयप्रकाश दुबळे, माणिकराव देशमुख, विद्यापीठाच्या क्रीडा रंजन विभागाचे अविनाश असनारे, क्रीडा अधिकारी अविनाश पुंड, अशोक घोगरे आदींची उपस्थिती होती. विभागीय आयुक्त बनसोड यांच्या हस्ते दीप प्रज्ज्वल करून चॅम्पियनशिपला सुरुवात करण्यात आली. यावेळी विविध राज्यातून आलेल्या स्पर्धक चमुंनी पाहुण्यांना परिचय करून दिला. सॉफ्ट बॉल चॅम्पियनशिप दररोज सकाळी ७ ते १0 व सायंकाळी ४ ते ७ या वेळात होणार आहे. या चॅम्पियनशिपमध्ये २५ मुलांच्या तर २२ मुलींचा संघ दाखल झाला आहे. ६ जून रोजी मान्यवरांच्या हस्ते सबज्युनिअर चॅम्पीयन ठरलेल्या संघाला मान्यवरांच्या हस्ते बक्षीसाचे वितरण केले जाणार आहे. शनिवारी सायंकाळपासून देशभरातील सॉफ्टबॉल चमू अमरावतीत दाखल होण्यास सुरुवात झाली होती. (प्रतिनिधी)