२८ शिक्षकांचे बोगस प्रस्ताव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2018 10:12 PM2018-06-13T22:12:55+5:302018-06-13T22:13:06+5:30

अलीकडेच झालेल्या जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या चांगल्याच वादग्रस्त ठरत आहेत. अनेक शिक्षकांनी आवडत्या ठिकाणी बदली करून घेण्यासाठी बोगस दस्तऐवज सादर करून प्रशासनाची दिशाभूल केल्याचे उघडकीस आले आहे.

28 teachers' bogus proposal | २८ शिक्षकांचे बोगस प्रस्ताव

२८ शिक्षकांचे बोगस प्रस्ताव

Next
ठळक मुद्देआॅनलाइन बदल्या : तपासणी मोहीम सुरूच

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : अलीकडेच झालेल्या जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या चांगल्याच वादग्रस्त ठरत आहेत. अनेक शिक्षकांनी आवडत्या ठिकाणी बदली करून घेण्यासाठी बोगस दस्तऐवज सादर करून प्रशासनाची दिशाभूल केल्याचे उघडकीस आले आहे. आजवर अशा २८ शिक्षकांची बदली प्रस्ताव असल्याचे निष्पन्न झाले असून, हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. अशा शिक्षकांवर शिक्षण विभागाकडून शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार असून, यामुळे अनेक शिक्षकांच्या हृदयाचे ठोके वाढले आहेत.
जिल्हा परिषदेच्या जवळपास २ हजार ९८७ शिक्षकांच्या बदल्या वर शिक्कामोर्तब झाले. मात्र, अनेकांनी बोगस दस्तावेज सादर करून प्रशासनाची दिशाभूल केल्याचा आरोप होत आहे. यासंदर्भात शिक्षण विभागाकडे प्राप्त तक्रारीची दखल घेण्यात आली आहे. याअनुषंगाने शिक्षण विभागाकडून पंचायत समिती स्तरीय चार सदस्यीय चौकशी समिती नेमली. चौकशीत या गुरुजींचे पितळ उघडे पडले आहे.
पुढील प्रक्रियेत होणारा खोळंबा शिक्षण विभागाला टाळता आला नाही, तर अशा शिक्षकांना नोटीस देऊन त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई केली जाईल. त्याची वेतनवाढ रोखण्यात येणार असल्याचे शिक्षण विभागाच्या खास सूत्राने सांगितले. या शिक्षकांना शिक्षा म्हणून अवघड क्षेत्रात हलविण्याचा प्राथमिक निर्णय झाला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, संवर्ग १ अर्थात विशेष प्रवर्गातील आणि संवर्ग २ म्हणजेच पती-पत्नी एकत्रीकरण यामधील शिक्षकांचा यात समावेश असल्याची माहिती आहे. संवर्ग १ प्रवर्गातील शिक्षकांच्या मोठ्या प्रमाणात आॅनलाईन बदल्या करण्यात आल्या आहेत. संवर्ग २ मधील शिक्षकांच्या बऱ्यापैकी बदल्या झाल्या आहेत. या शिक्षकांनी बदलीसाठी अर्ज सादर केले होते. ज्या शिक्षकांनी आॅनलाइन अर्ज सादर केले, त्यांच्या योग्य प्रमाणपत्राच्या चौकशीसाठी गटशिक्षणाधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, अधीक्षक आणि शिक्षण विस्तार अधिकाºयांची समिती या प्रकरणाची चौकशी करीत असल्याचे शिक्षण विभागाच्या सूत्रांनी सांगितले. या समितीने सर्व दस्तावेजांची कसून चौकशी केल्यानंतर आजघडीला २८ शिक्षकांची फंदफितुरी लक्षात आली आहे.

Web Title: 28 teachers' bogus proposal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.