२८ हजारांवर चाचण्या निगेटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2020 09:54 PM2020-08-16T21:54:42+5:302020-08-16T21:55:01+5:30
जिल्ह्यात एप्रिल रोजी हाथीपुऱ्यात पहिल्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाची नोंद झाली. मात्र, त्याचे दोन आठवड्यापासून संशयितांचे नमुने चाचणी नागपूर येथील शासकीय विषाणू परिक्षण प्रयोगशाळेत झाली होती. त्यानंतर रुग्णसंख्या वाढू लागल्याने येथील अहवालांचे नागपूरसह, अकोला व सेवाग्राम येथील केंद्रांवर परिक्षण व्हायला लागले.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : जिल्ह्यातील असिम्टोमॅटिक व हायरिस्कचे रुग्ण त्वरेने निष्पन्न होऊन त्यांच्यावर उपचार व्हावा व यामुळे संसर्ग टळून कोरोनाची साखळी बे्रक व्हावी, यासाठी जिल्ह्यात सात ठिकाणी असलेल्या स्वॅब तपासणी केंद्रावर आतापर्यंत ३३ हजार २०८ नमुन्यांची चाचणी करण्यात आली. त्यापैकी २८ हजार ८२९ नमुने निगेटिव्ह आलेले आहे. हे प्रमाण ८७ टक्के असल्याने जिल्ह्यास दिलासा मिळाला आहे.
जिल्ह्यात एप्रिल रोजी हाथीपुऱ्यात पहिल्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाची नोंद झाली. मात्र, त्याचे दोन आठवड्यापासून संशयितांचे नमुने चाचणी नागपूर येथील शासकीय विषाणू परिक्षण प्रयोगशाळेत झाली होती. त्यानंतर रुग्णसंख्या वाढू लागल्याने येथील अहवालांचे नागपूरसह, अकोला व सेवाग्राम येथील केंद्रांवर परिक्षण व्हायला लागले. मात्र, मे महिन्यापासून संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाची विषाणू परिक्षण प्रयोगशाळा सुरु झाल्याने अमरावती जिल्ह्यातील विषाणू संसर्गासंदर्भातील सर्व चाचण्या येथील लॅबद्वारेच होत आहेत.
जिल्ह्यात आतापर्यत ४४ हजार ९०५ नागरिकांची तपासणी जिल्हा जिल्हा सामान्य रुग्णालयासह इतर रुग्णालयात करण्यात आली. यामध्ये ३३ हजार २०८ चाचण्या करण्यात आल्यात. यापैकी केवळ २८ हजार ८२९ चाचण्यांचे अहवाल निगेटिव्ह तर ३७६६ अहवाल पॉझिटिव्ह आलेले आहे. यामध्ये ९५ नागरिकांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. सद्यस्थितीत १०९६ रुग्णांवर येथील कोविड रुग्णालयात उपचार सुरु आहेत. २१ रुग्ण नागपूर येथे उपचार घेत असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाने दिली.
अडीच हजार नागरिक कोरोनामुक्त
जिल्ह्यात आतापर्यंत २५८३ नागरिक संक्रमणमुक्त झाल्याची सुखद वार्ता आहे. हे प्रमाण ७० टक्के आहे. केंद्र व राज्य शासनाच्या नव्या मार्गदर्शक सूचनेनुसार संक्रमित रुग्णांवर उपचार होत आहेत. यामध्ये असिम्टोमॅटीक व सौम्य स्वरुपाच्या रुग्णांवर पाच दिवस औषधोपचार व पाच दिवस निरीक्षणात ठेवल्यानंतर रुग्णांना कोणतेही लक्षणे नसल्यास त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात येते. मात्र, या रुग्णांना सात दिवस गृह विलगीकरणात राहावे लागत असल्याची माहिती आहे.
‘सिरो’ सर्व्हेक्षणाचे नियोजन केव्हा?
जिल्ह्यातील किती नागरिकांचय शरिरामध्ये अॅन्टीबॉडीज विकसीत झाल्यात यासाठी रॅन्डमली ‘सिरो’ सर्व्हेक्षण करण्याचे पत्र राज्याच्या आरोग्य संचालकांनी जिल्हाधिकाऱ्यांसह जिल्हा शल्य चिकित्सक व महापालिकचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी तसेच जिल्हा आरोग्य अधिकाºयांना दिले आहे. याबाबत नियोजन सुरु असल्याची माहिती जिल्हा आरोग्य यंत्रणेद्वारा देण्यात आली. मात्र, यालाही आठवडा उलटला असतांना अद्याप नियोजन नसल्याल्याने ‘सिरो’ सर्व्हेक्षण केव्हा, असा प्रश्न नागरिकांचा आहे.