पश्चिम विदर्भातील ५०९ प्रकल्पांत २९ टक्के पाणीसाठा शिल्लक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2020 20:45 IST2020-04-29T20:24:22+5:302020-04-29T20:45:08+5:30
एकूण ५०९ प्रकल्पांत प्रकल्पीय संकल्पित उपयुक्त पाणीसाठा ३२२०.५५ दलघमी इतका आहे. आजचा उपयुक्त पाणीसाठा ९४९.८३ दलघमी एवढा आहे. त्याची टक्केवारी २९.४९ एवढी आहे.

पश्चिम विदर्भातील ५०९ प्रकल्पांत २९ टक्के पाणीसाठा शिल्लक
- संदीप मानकर
अमरावती : पश्चिम विदर्भातील मोठे नऊ प्रकल्प, मध्यम २४ व लघु ४७६ प्रकल्प असे एकूण ५०९ प्रकल्पांत केवळ २९.४९ टक्के पाणीसाठा शिल्लक असल्याने उन्हाळ्याच्या दीड महिन्यापर्यंत ते पाणी जपून वापरावे लागणार आहे, असे जलसंपदा व महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या अधिका-यांनी सांगितले. मोठ्या नऊ प्रकल्पांमध्ये सरासरी ४६.६७ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. गतवर्षी अनेक जिल्ह्यांत पाणीटंचाई निर्माण झाली होती. त्याची सर्वाधिक झळ बुलडाणा जिल्ह्याला पोहचली होती.
एकूण ५०९ प्रकल्पांत प्रकल्पीय संकल्पित उपयुक्त पाणीसाठा ३२२०.५५ दलघमी इतका आहे. आजचा उपयुक्त पाणीसाठा ९४९.८३ दलघमी एवढा आहे. त्याची टक्केवारी २९.४९ एवढी आहे. अमरावती शहराला पाणीपुरवठा करणारा उर्ध्व वर्धा या मोठ्या प्रकल्पात सद्यस्थितीत ५३.८१ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. यवतमाळ जिल्ह्यातील पुस प्रकल्पात ३७.२७ टक्के, अरुणावती १३.४४ टक्के, बेंबळा प्रकल्पात ५९.६९ टक्के पाणीसाठा आहे. अकोला जिल्ह्यातील काटेपूर्णा प्रकल्प ४८.१५ टक्के, वान ५१.१५ टक्के, तर बुलडाणा जिल्ह्यातील नळगंगा प्रकल्प ५३.५८ टक्के, पेनटाकळी ५१.०१ टक्के, खडकपुर्णा ३४.२१ टक्के पाणीसाठा आहे. यंदा बुलडाणा जिल्ह्याची स्थिती चांगली असल्याची माहिती जलसंपदा विभागाने २३ एप्रिलपर्यंतच्या अहवालात दिली.
२४ मध्यम प्रकल्पांची स्थिती
अमरावती जिल्ह्यतील शहानूर या मध्यम प्रकल्पांत ६२ टक्के, तर चंद्रभागा प्रकल्पात ६४.७८ टक्के, पूर्णा ६४.४९ टक्के, सपन ६३.८९ टक्के, तर यवतमाळ जिल्ह्यातील अधरपुस ६२.४७ टक्के, सायखेडा ५२.२४ टक्के, गोकी २१.७५ टक्के, वाघाडी ३६.५७टक्के, बोरगाव २६.१७ टक्के, नवरगाव ४४.६३ टक्के, अकोला जिल्ह्याती निर्गुणा २४.५१ टक्के, मोर्णा ४५.७८ टक्के, उमा १४.७३ टक्के, घुंगशी बॅरेज ५२ टक्के, वाशिम जिल्ह्यातील अडाण ४२.४५ टक्के, सोनल २७.९६ टक्के, एकबुर्जी ३६.३४ टक्के, बुलडाणा जिल्ह्यातील ज्ञानगंगा ६३.१९ टक्के, पलढग १०.७९ टक्के, मस ४१.१६ टक्के, कोराडी ६४.७५ टक्के, मन ५१.१५ टक्के, तोरणा २०.२८ टक्के, उतावळी ४२.९ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.