देवमाळीत भर दिवसा ३ लाख ७६ हजारांची चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2021 04:10 AM2021-06-20T04:10:18+5:302021-06-20T04:10:18+5:30
फोटो पी १९ देवमाळी परतवाडा : देवमाळी ग्रामपंचायत क्षेत्रात, अज्ञातांनी भरदिवसा बंद असलेले घर फोडून, ३ लाख ७६ हजार ...
फोटो पी १९ देवमाळी
परतवाडा : देवमाळी ग्रामपंचायत क्षेत्रात, अज्ञातांनी भरदिवसा बंद असलेले घर फोडून, ३ लाख ७६ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. यात ३ लाख १० हजार रुपयांचे १२४ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, १२०० रुपयाचे २० ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने, आणि नगदी रोख ६५ हजार रुपयाचा समावेश आहे. याहून अधिक जवळपास ७ ते ८ लाखांचा ऐवज चोरट्यांनी पाळविल्याचे फिर्यादीचे म्हणणे आहे.
लक्ष्मीनंदा नीलेश राखोंडे (रा. घोरे नगर, देवमाळी- परतवाडा) यांच्या तक्रारीवरून परतवाडा पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध भादंविचे कलम ३८०, ४५४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
राखोंडे कुटुंबीय १८ जून रोजी बोरगाव पेठ येथील नातेवाईकांकडे गेले होते. तेथून ते अचलपूर येथे परतलेत असता, सायंकाळी ६ वाजता त्यांना मुख्य दारासह बेडरूमचे दार उघडे दिसले. घरातील तिन्ही कपाट व त्याचे लॉकर्सही फोडून चोरट्यांनी चोरी केल्याचे लक्षात येताच राखोंडे कुटुंबीयांनी घटनेची माहिती परतवाडा पोलिसांना दिली.
माहिती मिळतात पोलिसांनी घटनास्थळ गाठले. लगतचा परिसर पिंजून काढला. रात्री उशिरा शहरातील काही भागात चोरीच्या अनुषंगाने विचारपूस केली. डॉग स्कॉडसह फिंगर प्रिंट एक्सपर्ट्सना बोलाविल्या गेले. सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेजही पोलिसांनी तपासलेत. या फूटेजमध्ये संशयित अज्ञात इसम दिसून आल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.
कोट
तक्रारीवरून अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चोरट्यांचा शोध सुरू आहे. फिर्याद ३ लाख ७६ हजारांची आहे.
- सदानंद मानकर, ठाणेदार, परतवाडा
कोट
फिर्याद ३ लाख ७६ हजारांच्या चोरीची असली तरी घरातील ७ ते ८ लाखांचा ऐवज चोरट्यांनी पळविला आहे.
- लक्ष्मीनंद राखोंडे, फिर्यादी