खरीप हंगामात होणार ३0 कोटींची उलाढाल

By admin | Published: June 2, 2014 12:52 AM2014-06-02T00:52:41+5:302014-06-02T00:52:41+5:30

वर्षभर संसाराचा गाडा सुरळीत चालावा यासाठी खरीप हंगाम शेतकर्‍यांसाठी अधिक महत्त्वाचा आहे.

30 crores turnover in Kharif season | खरीप हंगामात होणार ३0 कोटींची उलाढाल

खरीप हंगामात होणार ३0 कोटींची उलाढाल

Next

धामणगाव रेल्वे : वर्षभर संसाराचा गाडा सुरळीत चालावा यासाठी खरीप हंगाम शेतकर्‍यांसाठी अधिक महत्त्वाचा आहे. या हंगामासाठी जून महिन्यात बी-बियाणे, खते, मशागत व शेतमजुरीकरिता तालुक्यात ३0 कोटी रूपयांची उलाढाल होण्याचा अंदाज आहे. उधारीवर घेतलेले बी-बियाणे, खते यावर कृषी केंद्र संचालक वर्षाकाठी चार टक्के व्याज दर आकारतात.

धामणगाव तालुक्याचे भौगोलिक क्षेत्र ६२ हजार ३३१ हेक्टर आहे. खरीप हंगामात लागवडीचे क्षेत्र ५१ हजार ६८७ हेक्टर आहे. या हंगामाच्या जून महिन्यात मोठय़ा प्रमाणात आर्थिक उलाढाल होते. मागील वर्षीपेक्षा कपाशीचे क्षेत्र वाढणार आहे. २0 हजार हेक्टरमध्ये कपाशीचा पेरा होणार असल्याचे कृषी विभागाचे म्हणणे आहे. १0 कोटी रूपयांच्या जवळपास खर्च येणार आहे. इतर पिकांमध्ये मका, मूग, उडीद, ज्वारी, १ हजार हेक्टर असून ५0 लाख रूपयासह या महिन्यात बी-बियाण्याकरिता १७ कोटी २५ लाख रूपयांची उलाढाल एका महिन्यात होते.

यंदा २३ हजार हेक्टरमध्ये सोयाबीनचा पेरा होण्याचा अंदाज कृषी विभागाने वर्तविला आहे. ६ कोटी रूपयांचा खर्च या बियाणे खरेदीवर होणार आहे. ७ हजार ८३0 हेक्टरमध्ये तुरीची लागवड होणार असून ९00 क्विंटल तुरीचे बियाणे लागणार आहे.

दिवसेंदिवस महागाईने उच्चांक गाठला असल्याने ग्रामीण भागात मजुरीचे दरही वाढले आहे. शेतीच्या कामाकरिता मजूर मिळणे कठीण झाले आहे. कपाशीच्या पेर्‍यासाठी सारे पाडणे, टोपण करणे याकरिता प्रती हेक्टरी ५00 रूपयांचा खर्च अधिक होणार आहे. कपाशी बियाणे लागवड करताना मजुरीसाठी १ कोटी रूपये खर्च होत असल्याचे कृषी विभागाने सांगितले. तर सोयाबीन, तूर या बियाण्याचा पेरा करतांना मजुरीकरिता २ हेक्टरसाठी १ हजार २00 रूपयांच्या अधिक खर्च येते. २ कोटी ७५ लाख रूपये खर्च होतो. मजुरी व मशागतीकरिता ४ कोटींच्यावर खर्च शेतकर्‍यांचा होतो.

तालुक्यातील शेतकर्‍यांनी सहकारी व राष्ट्रीयीकृत बँकेचे पीक कर्ज घेतले तरी या रकमेत बि-बियाणे, खते, मजुरी व मशागत खर्च होत नसल्याने कृषी केंद्र संचालकांकडून एका वर्षांकरिता ४ टक्के व्याजाने बियाणे खरेदी करून शेतीत लागवड करण्यात येते व उत्पादनानंतर ही बी-बियाण्याची रक्कम दिली जात असल्याची माहिती पुढे आली आहेत. केवळ १0 टक्के शेतकरी यंदा सावकारांच्या दारी पोहचल्याचे चित्र आहे.

तालुक्यात मृग नक्षत्राचा पाऊस पाहिजे त्या प्रमाणे झाला तर येत्या १८ जुलैपर्यंत तालुक्यात दरवर्षीच्या सरासरी प्रमाणे पाऊस झाल्यास उत्पादनात घट होण्याची शक्यता मावळण्याची चिन्हे आहेत.

Web Title: 30 crores turnover in Kharif season

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.