वृक्षतोडीसाठी लागणार ३० प्रकारची कागदपत्रे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2018 05:45 AM2018-06-01T05:45:45+5:302018-06-01T05:45:45+5:30

शासनाने १३ कोटी वृक्षलागवडीची मोहीम हाती घेतली असली, तरीही अवैध वृक्षतोड कायम आहे. मात्र, आता शासनाने मालकी प्रकरणाच्या वृक्षतोडीसाठी ३० प्रकारची कागदपत्रे आवश्यक केली आहेत.

30 kinds of documents required for the tree | वृक्षतोडीसाठी लागणार ३० प्रकारची कागदपत्रे

वृक्षतोडीसाठी लागणार ३० प्रकारची कागदपत्रे

Next

गणेश वासनिक  
अमरावती : शासनाने १३ कोटी वृक्षलागवडीची मोहीम हाती घेतली असली, तरीही अवैध वृक्षतोड कायम आहे. मात्र, आता शासनाने मालकी प्रकरणाच्या वृक्षतोडीसाठी ३० प्रकारची कागदपत्रे आवश्यक केली आहेत. या परवानगीविना वृक्षतोड करणाऱ्यांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल होतील, असे आदेश शासनाने काढले आहेत.
वनविभागाचे प्रधान सचिव विकास खारगे यांच्या स्वाक्षरीने याबाबत नवी नियमावली जारी करण्यात आली आहे. अवैध वृक्षतोडीचे प्रकरण निदर्शनास आल्यास त्या भागातील संबंधित अधिकाºयांना जबाबदार धरले जाईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
मालकी जागेवरील वृक्षतोड परवानगीबाबत अर्ज आल्यास वनपाल, वनक्षेत्रपालांना घटनास्थळी जाऊन वृक्षाचे मूल्यांकन करावे लागणार आहे.

Web Title: 30 kinds of documents required for the tree

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.