पोलीस कुटुंबाला ३० लाखांचा धनादेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 1, 2018 11:12 PM2018-09-01T23:12:33+5:302018-09-01T23:13:08+5:30
अपघाती मृत्यू पावलेल्या पोलिसाच्या पश्चात कुटुंबांना अॅक्सीस बँकेकडून शुक्रवारी ३० लाखांचा धनादेश देण्यात आला. अपघात विम्यात मिळालेल्या लाभाचा धनादेश पोलीस आयुक्त संजयकुमार बाविस्कर यांच्या हस्ते देण्यात आला आहे.
अमरावती : अपघाती मृत्यू पावलेल्या पोलिसाच्या पश्चात कुटुंबांना अॅक्सीस बँकेकडून शुक्रवारी ३० लाखांचा धनादेश देण्यात आला. अपघात विम्यात मिळालेल्या लाभाचा धनादेश पोलीस आयुक्त संजयकुमार बाविस्कर यांच्या हस्ते देण्यात आला आहे.
फे्रजरपुरा पोलीस ठाण्यात कार्यरत संजय वानखडे यांचे काही दिवसांपूर्वी अपघातात मृत्यू झाला. राज्यातील बहुताश पोलिसांचे वेतन हे अॅक्सिस बँकेतून होते. बँकेने त्यांना अपघात विम्याचा लाभ देण्याची योजना सुरू केली आहे. शुक्रवारी संजय वानखडेंच्या कुटुंबीयांना विम्याच्या लाभाचे ३० लाख रुपये धनादेशाच्या माध्यमातून देण्यात आले तसेच मुलाच्या शिक्षणासाठी आणखी दोन लाख रुपये देण्यात येणार आहेत. यावेळी पोलीस आयुक्त संजयकुमार बाविस्कर, पोलीस उपायुक्त प्रदीप चव्हाण, निवा जैन, शशिकांत सातव, अॅक्सिसचे डोहरे, आल्हाद कलोती, अतुल अकर्ते व गाडगेनगर शाखेचे अमोल लोटे उपस्थित होते.