चाणाक्ष चालकामुळे उघड झाली ३० लाखांची तस्करी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2021 04:15 AM2021-01-03T04:15:09+5:302021-01-03T04:15:09+5:30
पोलीस ठाणे माहिती नसल्याने थेट पोलीस आयुक्तालयापुढे बस आणली. शहर गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांच्या मदतीने ही बस दुपारी १ च्या ...
पोलीस ठाणे माहिती नसल्याने थेट पोलीस आयुक्तालयापुढे बस आणली. शहर गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांच्या मदतीने ही बस दुपारी १ च्या सुमारास फ्रेजरपुरा ठाण्यात नेण्यात आली. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन नागपूरकरिता त्याच सीटवर बसलेला तिसरा प्रवासी पंकजसिंह सुधीरसिंह तोमर (रा. मध्यप्रदेश) याला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्या ताब्यातील लगेज जप्त करण्यात आले. वृत्त लिहिस्तोवर पृष्ठाचा डबा व पोत्यातून सुमारे ३० लाखांचे चांदीचे दागिने पोलिसांनी दोन पंचांसमक्ष मोजले होते, तर सॅकमध्ये नेमके काय आहे, ही बाब पुढे आली नव्हती.बॉक्स:
आठ प्रवासी अन्य बसने रवानाअमरावतीहून नागपूरकरिता आठ प्रवासी बसले होते. त्यांनाही बससोबत ठाण्यात नेण्यात आले. तेथून चालक, वाहक यांनी आगार व्यवस्थापकाशी संपर्क साधून अमरावती आगरात पोहचविण्याची व्यवस्था केली. यानंतर त्यांना अन्य बसने नागपूरकरिता रवाना करण्यात आले.
कोटलगेजमध्ये गांजा किंवा इतर पदार्थ तर नाही ना, अशी मला शंका आली. दोन वाहक व एका चालक तसेच प्रवाशांच्या सहकार्याने मी तो कार्टन फाडले तेव्हा त्यात चांदीचे दागिने असल्याचे लक्षात आले. तेव्हा बस ठाण्यात वळविण्याचा धाडसी निर्णय घ्यावा लागला.
मुकेश हुकरे, चालक (नागपूर)