अपघाती मृत्यू झालेल्या पोलिसाच्या कुटुंबाला ३० लाख
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2018 10:34 PM2018-06-29T22:34:21+5:302018-06-29T22:34:59+5:30
अपघाती मृत्यू पावलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याला एका बँकेमार्फत ३० लाखांचा धनादेश देण्यात आला. पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांच्या हस्ते शुक्रवारी तो धनादेश मृत पोलिसाच्या कुटुंबीयांना प्रदान करण्यात आला. पहिल्यांदाच अशाप्रकारची मदत मिळाल्याने पोलीस वर्तुळात समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : अपघाती मृत्यू पावलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याला एका बँकेमार्फत ३० लाखांचा धनादेश देण्यात आला. पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांच्या हस्ते शुक्रवारी तो धनादेश मृत पोलिसाच्या कुटुंबीयांना प्रदान करण्यात आला. पहिल्यांदाच अशाप्रकारची मदत मिळाल्याने पोलीस वर्तुळात समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
माजी सैनिक सुनील सुकाडी भलावी हे पोलीस विभागात रुजू झाल्यानंतर त्यांचे १ सप्टेंबर २०१७ रोजी अपघाती निधन झाले. पोलिसांसाठी असणाऱ्या बँकेच्या योजनेत सुनील भलावी यांचे नाव होते. बँक अधिकारी सृष्टी राजन नंदा, अजय पिठोरे, यतींद्र नालकर्णी, आल्हाद कलोती, समीर झंझाड, अतुल अकर्ते व परमानंद कुमार यांनी सुनील भलावी यांच्या कौटुंबिक सदस्यांना योजनेतील लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले. त्यानुसार सुनील भलावी यांच्या कुटुंबीयांना ३० लाखांचा धनादेश प्रदान करण्यात आला. याशिवाय मृताच्या मुलाच्या शिक्षणासाठीही चार वर्षांपर्यंत एक लाखांची मदत केली जाणार असल्याची माहिती पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांनी दिली. यावेळी उपायुक्तद्वय व अन्य पोलीस अधिकारी उपस्थित होते.
अपघाती निधन झालेल्या पोलीस कर्मचाऱ्याला बँॅकेच्या योजनेतून लाभ मिळाला आहे. याशिवाय त्याच्या मुलाच्या शिक्षणासाठीसुद्धा चार वर्षांपर्यत खर्च दिला जाणार आहे.
- दत्तात्रय मंडलिक,
पोलीस आयुक्त.