रोकड ठेवण्यासाठी ३० टक्के वाटा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2017 12:22 AM2017-11-19T00:22:53+5:302017-11-19T00:23:27+5:30

विदेशी महिला पैशांचे आमिष दाखवून मोहजालात फसविण्यासाठी सोशल मीडियाचा वापर करीत आहेत.

30 percent contribution to hold cash! | रोकड ठेवण्यासाठी ३० टक्के वाटा!

रोकड ठेवण्यासाठी ३० टक्के वाटा!

googlenewsNext
ठळक मुद्देअफगाणमध्ये आर्मी आॅफिसर : देशात गुंतवणूक करण्याचेही आमिष

श्रीकृष्ण मालपे
आॅनलाईन लोकमत

नेरपिंगळाई : विदेशी महिला पैशांचे आमिष दाखवून मोहजालात फसविण्यासाठी सोशल मीडियाचा वापर करीत आहेत. इंटरनेटच्या माध्यमातून जग हे खेडे बनले आहे. त्याचा पुरेपूर फायदा घेतला जात आहे.
अमरावतीतील एका व्यक्तीला आपल्या जाळ्यात अडकविल्यानंतर अफगाणिस्तानात असलेल्या एका सैनिकाचे पैसे पार्सलने पाठवून ते जवळ ठेवण्यासाठी ३० टक्के रक्कम देणार असल्याचे सांगितले गेले. विशेष म्हणजे, यासाठी एक व्यक्ती पाठवित असल्याचे सांगण्यात आले.
अमरावती येथील दिनकर (काल्पनिक नाव) यांना फेसबूकवर लोरी हॅरिस नावाच्या महिलेची फ्रेन्ड रिक्वेस्ट आली. दिवाकर यांनी फ्रेन्ड रिक्वेस्ट स्वीकारल्यावर त्यांना लोरी हॅरिस हिने ई-मेलद्वारे चॅटिंग सुरू केले. लोरी हॅरिस हिने मॅसेजमधून दिवकर यांना सांगितले की, ‘मी अमेरिकेत नासा आॅफिसर असून, आर्मीत नोकरीला आहे. सध्या तालिबानच्या बंदोबस्ताकरिता अफगाणिस्तानमध्ये असून, येथील जनतेचा तसेच शस्त्रास्त्रे खरेदी करण्याकरिता माझ्याकडे खुप मोठ्या प्रमाणात पैसा आहे. हा पैसा आम्ही कुठल्याही वित्तीय संस्थेला देऊ शकत नाही तसेच हा पैसा अधिकृतपणे अमेरिकेतही नेऊ शकत नाही. यामधील माझा हिस्सा म्हणून ४२ लाख अमेरिकन डॉलर मी तुम्हाला माझे प्रतिनिधी म्हणून तुमच्याकडे सुरक्षित ठेवण्याकरिता पाठवित आहे. हा पैसा तुमच्याकडे पार्सलने पाठविण्यात येईल. पुढील महिन्यात अफगाणिस्तानातील तालीबान विरोधातील कारवाई संपल्यानंतर मी तुमच्या घरी येऊन माझा पैसा परत नेईल. माझा पैसा तुमच्याकडे सुरक्षित ठेवल्याबद्दल मी तुम्हाला या पैशाच्या ३० टक्के रक्कम देईन तसेच उरलेली रक्कम मी तुमच्याच देशात गुंतवणूक करेन. याकरिता संबंधित व्यक्ती तेथून निघाली आहे.’ याकरिता दिवाकर यांचे नाव, पत्ता, फोन नंबर, व्यवसाय, वय, जवळचे विमानतळ, देश याची माहिती मागितली.
फसवणूक झालेल्या व्यक्ती श्रीमंत
या प्रकरणातील ज्यांची फसवणूक झाली आहे, अशा सर्व व्यक्ती श्रीमंत आहेत. त्यांना इंग्रजीचे चांगले ज्ञान आहे. त्यांच्या फ्रेण्डलिस्टमध्ये असलेल्या व्यक्तीच्या आधारे त्यांची सामाजिक स्थिती जाणल्यानंतरच त्यांच्याशी संपर्क साधण्यात आला आहे. फेसबुक किंवा सोशल मीडियावर अनेक प्रकारचे संदेश पाठवून मैत्री केली जाते. मात्र, अशा धोकादायक मैत्रीपासून दूर राहणे यातच शहाणपण आहे.

 

Web Title: 30 percent contribution to hold cash!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.