शिक्षा परमीटचे ३० पर्यंत नूतनीकरण
By admin | Published: November 24, 2015 12:30 AM2015-11-24T00:30:00+5:302015-11-24T00:30:00+5:30
रिक्षांच्या रद्द झालेल्या परमीटचे नूतनीकरण करण्यास शासनाने मान्यता दिल्याने बहुतांश परवानाधारकांनी या संधीचा लाभ घेतला आहे.
शासनाचे आदेश : मुदतबाह्य आॅटो होणार स्क्रॅप
अमरावती : रिक्षांच्या रद्द झालेल्या परमीटचे नूतनीकरण करण्यास शासनाने मान्यता दिल्याने बहुतांश परवानाधारकांनी या संधीचा लाभ घेतला आहे. या संधीपासून कोणीही वंचित राहू नये म्हणून नूतनीकरणाला मुदतवाढ देण्यात आली आहे. शासनाने नव्याने काढलेल्या अध्यादेशानुसार २० नोव्हेंबरपर्यंत रिक्षा परवाना नूतनीकरण करता येणार आहे.
परवान्याची मुदत संपूनही ज्यांना नूतनीकरण करता येणार आहे. त्यांच्यावर १६ तारखेपासून कारवाई करण्यास प्रारंभ झाला आहे. कालबाह्य झालेल्या आॅटोवर जेसीबी चालवून समूळ नष्ट करण्याचे आदेश परिवहन आयुक्तांनी सर्व आरटीओंना नुकतेच दिले आहेत. अशा पद्धतीच्या कारवाईमुळे आमच्यावर बेरोजगारीची कुऱ्हाड ओढवेल असे आॅटोचालकांचे म्हणणे आहे. शासन निर्णयानुसार राज्यातील आॅटो रिक्षाचे परवाने रद्द झालेल्यांना संधी म्हणून १५ हजार रुपयांपर्यंतचे शुल्क भरून परवाना नूतनीकरणास परवानगी देण्यात आली आहे. त्यासाठी ३१ आॅक्टोंबरपर्यंत मुदत देण्यात आली होती. मात्र मुदतीत बहुतांश परवाना धारक रिक्षाचालक परवान्याचे नूतनीकरण करू शकले नाहीत. दरम्यान ज्यांनी १६ नोव्हेंबरपर्यंत परवान्याचे नूतनीकरण केलेले नाही, त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे. परिवहन मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली २८ आॅक्टोबर रोजी नूतनीकरण झालेल्या रद्द झालेल्या आॅटोरिक्षा परवाण्याचे नूतनीकरणाबाबत बैठक झाली. या बैठकीत सर्व जिल्ह्यांचा आढावा घेण्यात आला. आॅटोरिक्षा नूतनीकरणासाठी मिळालेल्या अत्यल्प प्रतिसाद या बैठकीत समोर दिसून आला. त्यामुळे परिवहन आयुक्तांनी क्षेत्रीय अधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्यामुळे मोहीम राबवून सध्याच्या आॅटोरिक्षांवरील थकीत कर वसूल करण्यात यावा, असे ठरले. त्यामुळे परवाने रद्द झाले असतील. अशा आॅटोरिक्षा परवानाधारकांनी शासन निर्देशानुसार सर्व प्रकारचे कर भरून ३० नोव्हेंबरपर्यंत नूतनीकरण करून घ्यावे, असे आवाहन प्रादेशिक परिवहन विभागाने केले आहे. (प्रतिनिधी)