आरटीओच्या ३० सेवा झाल्या फेसलेस, संकेतस्थळावर जा अन् लाभ घ्या
By गणेश वासनिक | Published: June 23, 2023 03:25 PM2023-06-23T15:25:10+5:302023-06-23T15:26:14+5:30
नवीन पद्धतीनुसार अर्जदार ऑनलाइन पद्धतीने अर्ज करताना आधार क्रमांकाची नोंदणी या प्रणालीवर करणार आहे.
अमरावती : नागरिकांना आरटीओच्या कामाकरिता कार्यालयात चकरा मारू नये, याकरिता नागरिकांनी आधार क्रमांकाचा वापर करून फेसलेस पद्धतीने परिवहन विभागाकडून आरटीओ सेवा देण्यात येत असून याचा लाभ घेण्याचे आव्हान प्रादेशिक परिवहन अधिकारी राजाभाऊ गित्ते यांनी केले आहे. केंद्र शासनाच्या १६ सप्टेंबर २०२२ रोजी च्या अधिसूचनामध्ये ५८ सेवा आधार क्रमांकचा वापर करून फेसलेस पद्धतीने देणेबाबत अधिसूचित केले आहे.
परिवहन विभागाने आतापर्यंत ३० सेवा फेसलेस केल्या आहे. नवीन पद्धतीनुसार अर्जदार ऑनलाइन पद्धतीने अर्ज करताना आधार क्रमांकाची नोंदणी या प्रणालीवर करणार आहे. आधार क्रमांक वरील मोबाईल नंबरवर ओटीपी जाणार असून ओटीपीची नोंदणी केल्यानंतर वाहन मालकाचे नाव व कार्यालय अभिलेखा वरील नाव याची खातरजमा होणार आहे. अर्जदारामार्फत वाहनाचे कामासंबंधी इतर कागदपत्रे अपलोड करावी लागणार आहे. आधार क्रमांकाचा वापर करून अर्ज केल्यास अर्जदारास कार्यालयात इतर कागदपत्रे जमा करण्यासाठी येण्याची आवश्यकता नाही.
या सेवा झाल्या फेसलेस -
१)नोंदणी पुस्तिकेमध्ये पत्ता बदल
२) दुय्यम नोंदणी पुस्तिका देणे,
३) भाडे खरेदी करा रद्द करणे
४) दुय्यम फिटनेस
५) ना हरकत प्रमाणपत्र
६) वाहनाचे विवरण पत्र
७) मालकी हस्तांतरण करणे
८) परवाना हस्तांतरण
९) परवाना हस्तांतरण(परवानाधारकांच्या मृत्यूनंतर ),
१०) परवाना रद्द करणे
११) दुय्यम परवाना देणे
१२) तात्पुरता परवाना
१३) विशेष परवाना
१४) परवाना जमा करणे
१५) परवाना कायमस्वरूपी जमा करणे
१६) परवाना नूतनीकरण
१७) शिकाऊ अनुज्ञप्ती देणे
१८) अनुज्ञप्ती वरील पत्ता बदलविणे
१९) अनुज्ञप्तीचे नूतनीकरण करणे
२०) अनुज्ञप्तीत बदल करणे
२१) अनुज्ञप्तीचे विवरणपत्र
२२) अनुज्ञप्ती वरील एखादे लायसन रद्द करणे
२३) कंडक्टर लायसनमध्ये पत्ता बदल करणे
२४) दुय्यम शिकाऊ अनुज्ञप्ती देणे
२५) दुय्यम अनुज्ञप्ती देणे
२६) अनुज्ञप्तीवरील पत्ता बदल
२७) उत्तेजनात्मक माल वाहून नेण्याचे अनुज्ञप्तीत नोंद करणे
२८) अनुज्ञप्ती वरील बायोमेट्रिक मध्ये बदल करणे
२९) कंडक्टर लायसन नूतनीकरण
३०) दुय्यम कंडक्टर लायसन
------------------------------------
या वेबसाईटवर जा अन् लाभ घ्या
Sarathi.parivahan.gov.in
Vahan.parivahan.gov.in