दादासाहेबांच्या जयंतीनिमित्त ३०० मुखवट्यांची मांडणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2018 11:59 PM2018-10-30T23:59:16+5:302018-10-30T23:59:34+5:30

श्री दादासाहेब गवई चॅरिटेबल ट्रस्टद्वारा संचालित फ्रेजरपुरा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यालयात दादासाहेब गवई यांच्या जयंतीचे औचित्य साधून मंगळवारी त्यांचे विविधरंगी ३०० मुखवटे तयार करण्यात आले.

300 masks laid out on the birth anniversary of Dadasaheb | दादासाहेबांच्या जयंतीनिमित्त ३०० मुखवट्यांची मांडणी

दादासाहेबांच्या जयंतीनिमित्त ३०० मुखवट्यांची मांडणी

Next
ठळक मुद्देडॉ. आंबेडकर विद्यालयाची संकल्पना : विद्यार्थी आनंदाने भारावले

अमरावती : श्री दादासाहेब गवई चॅरिटेबल ट्रस्टद्वारा संचालित फ्रेजरपुरा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यालयात दादासाहेब गवई यांच्या जयंतीचे औचित्य साधून मंगळवारी त्यांचे विविधरंगी ३०० मुखवटे तयार करण्यात आले.
दादासाहेब गवई यांच्याबद्दल पुस्तकातून, वर्तमानपत्रातून माहिती घेत असतो; परंतु ‘आपणच दादासाहेब बनलो तर..!’, हे ऐकून विद्यार्थी चकित झाले आणि त्यांना मुखवटे बनवण्याची कल्पना स्फुरली. लगेच कलाशिक्षक आशिष देशमुख यांच्या मार्गदर्शनात कलाविश्व मंडळाचे सदस्य आदित्य नागदिवे, अनुज किर्दक, गौतम घोडेस्वार, मोसिम दर्गेवाले, अमित सावळे, मेहेर बावनकर, हेमंत मैकलवार, चेतन नितनवरे, शीतल जामनिक, साक्षी गजभिये, शेजल बोरकर, मानसी मोकल, मोमीना लांगे, आस्था चाफळकर, श्रद्धा शिंगाडे, पौर्णिमा शेळके, अलिशा लांगे यांनी जोमाने एका महिन्यात मुखवटे तयार करून पूर्ण केलेत. यासाठी टाकाऊ ड्रॉइंग शिट आणि हिरव्या, पिवळ्या, निळ्या, गुलाबी अशा अनेक रंगांचा वापर झाला. अजातशत्रू म्हणून ज्यांची ख्याती आहे, अशा दादासाहेबांचे ३०० मुखवटे तयार करण्यात आले. उपक्रमाला संस्थापक अध्यक्ष कमल गवई, अध्यक्ष कीर्ती अर्जुन, सचिव प्रकाश राव, मुख्याध्यापक सुनील कुकडे तसेच शिक्षक दरवाई, खटे, काटोलकर, जामदार, लव्हाळे, गावंडे, गवई, खोंडे, वगारे, महल्ले, वानखेडे, शिरसाट यांनी सहकार्य केले.

Web Title: 300 masks laid out on the birth anniversary of Dadasaheb

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.