बोदवड येथे लागलेल्या आगीत संत्रा व सागवानची ३०० झाडे जळून खाक

By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2019 08:12 PM2019-04-06T20:12:57+5:302019-04-06T20:13:43+5:30

 परतवाडा ( अमरावती ) - धु-याला लावलेल्या आगीत एका शेतातील संत्र्याची २५०, तर सागवानाची ५० झाडे जळून खाक झाली. ...

300 trees burnt in a fire in Bodwad | बोदवड येथे लागलेल्या आगीत संत्रा व सागवानची ३०० झाडे जळून खाक

बोदवड येथे लागलेल्या आगीत संत्रा व सागवानची ३०० झाडे जळून खाक

Next

 परतवाडा (अमरावती) - धु-याला लावलेल्या आगीत एका शेतातील संत्र्याची २५०, तर सागवानाची ५० झाडे जळून खाक झाली. या आगीत दोन हजार बांबू, स्प्रिंकलर साहित्य आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याने सुमारे ५० लाख रुपयांचे नुकसान झाले. याबाबत बोदड येथील शेतक-याने शिरजगाव पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. 

अचलपूर तालुक्यातील बोदड येथील ऋषीकेश रामदासपंत राऊत (२७) यांच्या शेताला शुक्रवारी दुपारी दीड वाजताच्या दरम्यान आग लागली. आगीची माहिती मिळताच त्यांनी शेतात जाऊन पाहिले असता, त्यांच्या शेतातील संत्र्याची २५० झाडे, ५० साग वृक्ष अशी जवळपास ३०० झाडे जळाल्याचे निदर्शनास आले. ही आग बाजूलाच शेत असलेले संपतराव गणपतराव सावरकर (७५, रा. करजगाव) यांनी लावल्याची तक्रार ऋषीकेश राऊत यांनी केली आहे. या घटनेने राऊत कुटुंबावर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे. शेताचा धुरा पेटवताना निष्काळजीपणा केल्याने आग वाºयाच्या वेगाने पसरत गेली आणि तिने होत्याचे नव्हते केले. शेतातील विद्युत पंपाद्वारे पाणी टाकून आग विझवण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, तोपर्यंत बराच उशिर झाला. राऊत यांनी कष्टाने उभारलेली बाग क्षणार्धात नष्ट झाली. 

संपतराव सावरकर या शेतकºयाने धुºयाला आग लावली. त्या आगीने माझे मोठे आर्थिक नुकसान झाले. याबाबत  शिरजगाव पोलिसांत फिर्याद दाखल केली. 
- ऋषीकेश राऊत,  शेतकरी, बोदड

Web Title: 300 trees burnt in a fire in Bodwad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.