कपाशीच्या विम्यात ३१ मंडळांना ठेंगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2018 10:30 PM2018-04-21T22:30:37+5:302018-04-21T22:32:08+5:30

बाधित कपाशीला हेक्टरी आठ हजारांची विमाभरपाई देण्यात येईल, अशी घोषणा कृषिमंत्र्यांनी २२ डिसेंबरला नागपूर अधिवेशनात केली. शासनघोषणेनुसार जिल्ह्यात १८.८८ कोटींची भरपाई मिळायला पाहिजे; मात्र या आठवड्याअखेर फक्त ९.११ कोटी रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्ग केले आहे.

31 boards will be invested in the cupboard insurance | कपाशीच्या विम्यात ३१ मंडळांना ठेंगा

कपाशीच्या विम्यात ३१ मंडळांना ठेंगा

Next
ठळक मुद्देशासन घोषणेचे तीनतेरा : १८ ऐवजी नऊ कोटींची भरपाई, कंपन्या जुमानेना

गजानन मोहोड ।
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : बाधित कपाशीला हेक्टरी आठ हजारांची विमाभरपाई देण्यात येईल, अशी घोषणा कृषिमंत्र्यांनी २२ डिसेंबरला नागपूर अधिवेशनात केली. शासनघोषणेनुसार जिल्ह्यात १८.८८ कोटींची भरपाई मिळायला पाहिजे; मात्र या आठवड्याअखेर फक्त ९.११ कोटी रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्ग केले आहे. यामध्ये ३१ महसूल मंडळांना वगळण्यात आल्याने विमा कंपन्या शासनाला जुमानत नाहीत अन् शासन केवळ वेळकाढू धोरण अवलंबीत असल्याचे वास्तव आहे.
गतवर्षीच्या खरिपात गुलाबी बोंडअळीमुळे १,९१,१७२ हेक्टरमधील जिरायती व बागायती कपाशीचे ३३ टक्क््यांवर नुकसान झाले. जिल्ह्यात कपाशीच्या एकूण २,०७,४५७ हेक्टर पेरणीक्षेत्रापैकी १८ हजार ८४० शेतकºयांनी २३,६०१ हेक्टरचा विमा काढला. यासाठी ४.७२ कोटींचा विमा भरणा करण्यात आला. सद्यस्थितीत यापैकी १०,९९४ शेतकऱ्यांना ९,११,४९,८३५ रुपये भरपाई कंपनीद्वारा परपरस्परच बँक खात्यात जमा करण्यात आलेली आहे. यामध्ये ४७ मंडळांत भरपाई मिळाली, तर ३१ महसूल मंडळ सद्यस्थितीत वगळण्यात आल्याचे स्पष्ट आहे.
अचलपूर तालुक्यातील सहा मंडळांमध्ये १,४९९ शेतकºयांना १,६२,३८,९५३ रुपये, अंजनगाव सुर्जी तालुक्यातील पाच मंडळात १,५६० शेतकºयांना १,७३,३७,७६७, चांदूर बाजार तालुक्यातील पाच मंडळात १,७२१ शेतकºयांना ५८,९८,६९७, चिखलदरा तालुक्यात तीन मंडळात ५५ शेतकºयांना २,७७,७८६, दर्यापूर तालुक्यात एका मंडळात ५०८ शेतकºयांना २०,६१,५९९, धामणगाव रेल्वे तालुक्यात सहा मंडळात १,२०६ शेतकºयांना ८०,९६,६५४, मोर्शी तालुक्यात सात मंडळात १,५५५ शेतकºयांना १,६७,६५,१५२, नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील ९७९ शेतकºयांना १,०८,९४,८५१, तिवसा तालुक्यातील पाच मंडळांत १,२७,३१,३२६ व वरूड तालुक्यातील दोन महसूल मंडळांत ३५७ शेतकºयांना ८,४७,०५१ रूपयांचा विमा शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आला. विमा भरपाई न मिळालेल्या शासन मदत केव्हा, असा शेतकऱ्यांचा सवाल आहे.
या महसूल मंडळात विमाभरपाई निरंक
मागच्या आठवड्यापासून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात कपाशीसाठी विमाभरपाई जमा करण्यात आली. सध्या ७९ पैकी ४८ मंडळात भरपाई देण्यात आली. उर्वरित ३१ मध्ये अमरावती व भातकुली तालुक्यात निरंक आहे. याशिवाय अंजनगाव तालुक्यात भंडारज, चांदूर बाजार तालुक्यात करजगाव, शिरजगाव कसबा, चिखलदरा तालुक्यात चुरर्णी, सेमाडोह, दर्यापूर तालुक्यात दर्यापूर, रामतीर्थ, सामदा, थिलोरी, वडनेरगंगाई व येवदा, धामणगाव रेल्वे तालुक्यात मंगरूळ दस्तगीर व वरूड तालुक्यात पुसला, राजुराबाजार, शेंदूरजना घाट, वरूड व वाठोडा महसूल मंडळात वाटप निरंक आहे.
अशी मिळाली पीकनिहाय भरपाई
जिल्ह्यात सद्यस्थितीत ४२,९०४ शेतकऱ्यांना ६० कोटी ८७ लाखांची भरपाई देण्यात आली. उडिदासाठी ४,०६५ शेतकºयांना ४.५८ कोटी, मुगासाठी ६,६८१ शेतकºयांना ७.५७ कोटी व सोयाबीनसाठी २१,१६४ शेतकºयांना ३९.५९ कोटींची भरपाई बँक खात्यात १७ एप्रिलअखेर जमा करण्यात आली असल्याची माहिती आहे.

Web Title: 31 boards will be invested in the cupboard insurance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.