४८ तासांत ३१ मृत्यू, उच्चांकी १७८४ पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2021 04:08 AM2021-05-03T04:08:46+5:302021-05-03T04:08:46+5:30

अमरावती : जिल्ह्यात ४८ तासांत उच्चांकी १,७८४ पॉझिटिव्ह व ३१ मृत्यूची नोंद झालेली आहे. यामध्ये शनिवारी आतापर्यंतचे उच्चांकी ९८० ...

31 deaths in 48 hours, highest 1784 positive | ४८ तासांत ३१ मृत्यू, उच्चांकी १७८४ पॉझिटिव्ह

४८ तासांत ३१ मृत्यू, उच्चांकी १७८४ पॉझिटिव्ह

Next

अमरावती : जिल्ह्यात ४८ तासांत उच्चांकी १,७८४ पॉझिटिव्ह व ३१ मृत्यूची नोंद झालेली आहे. यामध्ये शनिवारी आतापर्यंतचे उच्चांकी ९८० पॉझिटिव्ह व १२ मृत्यू, तर रविवारी ८०४ पॉझिटिव्ह आणि १९ मृत्यू झालेले आहे. त्यामुळे जिल्ह्यात आतापर्यंत १,११८ मृत्यूची नोंद झाली. यात ९८३ जिल्ह्यातील रुग्ण आहेत. याशिवाय ६७,५०१ कोरोनाग्रस्तांची नोंद झालेली आहे.

जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढताच आहे. शनिवारी १३ महिन्यांच्या संसर्ग काळातील उच्चांकी ९८० पॉझिटिव्हची नोंद झाली. याशिवाय ८,२३३ ॲक्टिव्ह रुग्णांचा उच्चांकही झालेला आहे. जिल्हा शल्यचिकित्सकांच्या अहवालानुसार शनिवारी ३,६९३ नमुन्यांची तपासणी झालेली आहे. यात २४.५४ ही पॉझिटिव्हिटी नोंद करण्यात आलेली आहे. याशिवाय रविवारी ३,६०९ नमुन्यांची तपासणी करण्यात आली. यात २२.२७ पॉझिटिव्हिटी नोंद झाल्याने जिल्ह्याच्या चिंतेत भर पडली आहे.

याशिवाय जिल्हा ग्रामीण भागात सद्यस्थितीत एकूण पॉझिटिव्हपैकी ७० टक्के रुग्णांची नोंद होत आहे. स्थानिक प्रशासनासह पोलिस यंत्रणा कारवाया करीत नसल्याने संचारबंदी नावालाच आहे. जीवनावश्यक शिवाय अन्य दुकानेही बऱ्याच ठिकाणी उघडल्या जात आहे व ११ वाजताच्या मर्यादेचे उल्लंघन होत असताना दंडात्मक कारवाया होत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनीच याविषयी गंभीरतेने लक्ष घालून स्थानिक प्रशासनाला आदेश देण्याची मागणी होत आहे.

बॉक्स

संचारबंदीच्या आदेशाला १५ मेपर्यंत मुदतवाढ

जिल्ह्यात ३० एप्रिलपर्यत संचारबंदीचे आदेश जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी जारी केले होते. आता या आदेशाला १५ मे पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे. तसे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केले आहेत. यानुसार अत्यावश्यक व जीवनावश्यक वस्तूची दुकाने सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत. याचे उल्लंघन करणाऱ्याविरुद्ध दंडनीय कारवाई व एफआयआर दाखल करण्यात येणार आहे.

बॉक्स

२४ तासांत १९ संक्रमितांचे मृत्यू

०००००००००००००

००००००००००००००००००००

(कृपया पाच ओळी जागा सोडावी)

Web Title: 31 deaths in 48 hours, highest 1784 positive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.