अमरावतीत यंदाच्या पावसाळ्यात वीज पडून ३१ व्यक्ती मृत; ४४ जखमी, ८३४ कुटुंब बाधित

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2017 10:20 PM2017-09-23T22:20:51+5:302017-09-23T22:26:12+5:30

यंदाच्या पावसाळ्यात विभागात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडला असला तीन महिन्यात वीज पडून ३१ व्यक्तींचा मृत्यू झालेला आहे.

31 people dead in Amravati this year; 44 injured, 834 interrupted family | अमरावतीत यंदाच्या पावसाळ्यात वीज पडून ३१ व्यक्ती मृत; ४४ जखमी, ८३४ कुटुंब बाधित

अमरावतीत यंदाच्या पावसाळ्यात वीज पडून ३१ व्यक्ती मृत; ४४ जखमी, ८३४ कुटुंब बाधित

Next
ठळक मुद्देयंदाच्या पावसाळ्यात विभागात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडला असला तीन महिन्यात वीज पडून ३१ व्यक्तींचा मृत्यू झालेला आहे. नैसर्गिक आपत्तीमध्ये विविध घटनांमध्ये ४४ व्यक्ती गंभीर जखमी झाल्यात तर ८३४ कुटुंब बाधित झाले आहे.

अमरावती- यंदाच्या पावसाळ्यात विभागात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडला असला तीन महिन्यात वीज पडून ३१ व्यक्तींचा मृत्यू झालेला आहे. नैसर्गिक आपत्तीमध्ये विविध घटनांमध्ये ४४ व्यक्ती गंभीर जखमी झाल्यात तर ८३४ कुटुंब बाधित झाले आहे. या तीन महिन्याच्या कालावधित सर्वात जास्त २,७४३ शेतजमिनींचे नुकसान यवतमाळ जिल्ह्यात झाले आहे.
यंदाच्या पावसाळ्यात एक जून ते १६ जून या कालावधित नैसर्गिक आपत्तीमुळे ४४ व्यक्तींचा मृत्यू झाला. यामध्ये सर्वाधिक २३ व्यक्ती यवतमाळ जिल्ह्यातील आहेत. अमरावती 6, अकोला 2, बुलडाणा १४ तर वाशिम जिल्हा निरंक आहेत. यामध्ये अमरावती जिल्ह्यातील सहाही व्यक्ती वीज पडून मृत झाल्या आहेत. अकोला येथे एक पुरात वाहून तर एक वीज पडून मृत झाली. यवतमाळ जिल्ह्यातल्या १६ व्यक्ती वीज पडून तर एक नाल्याच्या पुरात वाहून गेला आहेत. अकोला जिल्ह्यात एक अंगावर भिंत पडून, तर एक जण पुरात वाहून गेला आहे. वाशिम जिल्ह्यातील एक व्यक्ती पुरात वाहून गेली. तर बुलडाणा जिल्ह्यातील ११ व्यक्तींचा वीज पडून मृत्यू झाला आहे. या तीन महिन्याच्या आपत्तीमध्ये वाशिम जिल्ह्यात १.६० हेक्टर तर यवतमाळ जिल्ह्यात २,७४३.४८ हेक्टर मधील शेती पिकांचे नुकसान झाले आहे. पावसामुळे २० तालुक्यातील ८३४ कुटूंबे बाधित झाली आहेत. यामध्ये अमरावती १७०, अकोला नऊ व यवतमाळ जिल्ह्यात ६५५ कुटूंबाचा समावेश आहे.

मृतांच्या वारसाला मदत
यंदाच्या नैसर्गिक आपत्तीमध्ये मृत झालेल्या ३५ पैकी २७ प्रकरणे शासकीय मदतीसाठी पात्र ठरलेली आहेत. तर सात प्रलंबित आहेत. यामध्ये अमरावती जिल्ह्यात तीन प्रकरणात १२ लाख, अकोला जिल्ह्यात दोन प्रकरणात आठ लाख, यवतमाळ जिल्ह्यात १५ प्रकरणात ६० लाख, बुलडाणा जिल्ह्यात आठ प्रकरणात ३२ लाख रूपयांची शासकीय मदत देण्यात आलेली आहे.

नैसर्गिक आपत्तीमध्ये १५३ जनावरे मृत
या कालावधित विभागात १५३ लहाल-मोठी जनावरे मृत झाली आहेत. यामध्ये ४५ मोठ्या दुधाळ जनावरांसाठी मालकास ८.९६ लाख, ६९ लहान दुधाळ जनावरांसाठी २.१२ लाख, ओढकाम करणाºया ३३ जनावरांसाठी ६.५० लाख तर ओढकाम करणाºया लहान जनावरांसाठी ७६ हजारांची मदत करण्यात आलेली आहे. या कालावधितील जिवित व वित्तहानीमध्ये सर्वाधिक नुकसान यवतमाळ जिल्ह्यात झाले आहे.

Web Title: 31 people dead in Amravati this year; 44 injured, 834 interrupted family

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.