३१ हजार ३०० रूपये :

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2018 11:18 PM2018-03-06T23:18:32+5:302018-03-06T23:18:32+5:30

भारतीय चलनातील जुन्या हजार, पाचशेच्या नोटाबंदी, आर्थिक मंदी आणि नुकत्याच झालेल्या पीएनबी बँकेचा हजारो कोटींचा झालेल्या घोटाळ्याने बाजारपेठेत आर्थिक व्यवहाराची घडी विस्कटली असताना आता लग्नप्रसंगांना प्रारंभ होताच सोन्याच्या दराने उचल खाल्ली आहे.

31 thousand 300 rupees: | ३१ हजार ३०० रूपये :

३१ हजार ३०० रूपये :

Next
ठळक मुद्देसराफा दुकानात गर्दी वाढली, लग्नप्रसंगाचा परिणामसोन्याला झळाळी

आॅनलाईन लोकमत
अमरावती : भारतीय चलनातील जुन्या हजार, पाचशेच्या नोटाबंदी, आर्थिक मंदी आणि नुकत्याच झालेल्या पीएनबी बँकेचा हजारो कोटींचा झालेल्या घोटाळ्याने बाजारपेठेत आर्थिक व्यवहाराची घडी विस्कटली असताना आता लग्नप्रसंगांना प्रारंभ होताच सोन्याच्या दराने उचल खाल्ली आहे. हल्ली १० ग्राम सोने खरेदीसाठी ३१ हजार ३०० रूपये मोजावे लागत असून, फेब्रुवारी महिन्यात १० ग्राम सोने खरेदीसाठी २९ हजार ५०० रूपये एवढे दर होते.
सोने, चांदी, हिरे, मोती हे चल संपत्ती म्हणून ग्राहकांकडून खरेदीला प्राधान्य दिले जाते. विशेषत: बाजारपेठेत सोने गहाण ठेवून आलेल्या प्रसंगातून वाट शोधली जाते. महिला वर्ग तर पै-पै गोळा करून सोन्याचे आभूषण खरेदी करतात. कारण मुलाबाळांचे शिक्षण, लग्नप्रसंग, वैद्यकीय उपचार आणि बिकटसमयी वेळीच काही पैसे उभे करता यावे, अशी महिलांची धारणा आहे. त्यामुळे कोणतीही गृहिणी खर्चात काटकसर करून सोन्याचे दागिने तयार करून ठेवत असल्याचे वास्तव आहे. परंतु, नव्या वर्षाला प्रारंभ होताच जानेवारीपासून अचानक सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. गतवर्षी प्रति १० ग्राम सोन्याचे दर ३० हजारांच्या असताना जानेवारी २०१८ पासून ३० हजार ७५० रूपये दर झाल्याचे सराफा बाजारातील माहिती आहे. जानेवारीपासून लग्नप्रसंग सुरू झाले असून अशातच शेअर बाजारात मोठे फेरबदल झाल्याने याचा परिणाम सोने व्यवसायावर झाल्याचे बोलले जात आहे. चार महिन्यांपूर्वी सराफा बाजारात अस्थिरतेचे वातावरण होते. सोने, चांदी खरेदी-विक्रीचे व्यवहार ठप्प असताना लग्नप्रसंगामुळे जानेवारीपासून सराफा दुकानांमध्ये सोने खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी होत असल्याचे चित्र आहे. सोने, चांदी खरेदी करताना जीएसटीचा भुर्दंड ग्राहकांना सहन करावा लागत आहे. जीएसटीमुळे मध्यंतरी ग्राहकांनी सोने- चांदी खरेदीकडे पाठ फिरविली होती. मात्र, दोन ते तीन महिन्यात सोने वधारल्याने अवकळा आलेल्या सराफा दुकानांमध्ये ग्राहकांची गर्दी वाढत आहे.

चार महिन्यांपूर्वी सराफा दुकानांमध्ये सोने-चांदीचे दागिने तयार करणे अथवा खरेदीसाठी ग्राहक फिरकत नव्हते. परंतु जानेवारीपासून थोडीफार गर्दी होत आहे. लग्नप्रसंगामुळे सोन्याच्या दरात भाववाढ झाली आहे. सोन्याची भाववाढ जूनपर्यंत राहील, असे संकेत आहेत.
- सिमेश श्रॉफ,
सराफा व्यावसायिक, अमरावती

Web Title: 31 thousand 300 rupees:

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.