अचलपूर काँग्रेसतर्फे मुख्यमंत्री निधीत ३१ हजार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2021 04:13 AM2021-05-22T04:13:28+5:302021-05-22T04:13:28+5:30
परतवाडा : माजी पंतप्रधान दिवंगत राजीव गांधी पुण्यतिथीनिमित्त अचलपूर शहर व ग्रामीण काँग्रेसतर्फे गरजूना अन्नधान्य, मास्क व जीवनपयोगी ...
परतवाडा : माजी पंतप्रधान दिवंगत राजीव गांधी पुण्यतिथीनिमित्त अचलपूर शहर व ग्रामीण काँग्रेसतर्फे गरजूना अन्नधान्य, मास्क व जीवनपयोगी वस्तूचे वाटप करण्यात आले.
अचलपूर ग्रामीण व शहर काँग्रेसतर्फे मुख्यमंत्री सहायता निधीत ३१ हजार रुपयांचा डी.डी तहसीलदारांकडे सुपूर्द करण्यात आला. याप्रसंगी तालूका अध्यक्ष श्रीधर काळे, शहर अध्यक्ष श्रीकांत झोडपे, जिल्हा सचिव कैलाश आवारे, पप्पू चदंनानी, कार्याध्यक्ष अमोल बोरेकार, पं स.सदस्य सुनील तायडे, राजेश काळे, नामदेव तनपुरे, नरेंद्र येऊतकर, अमोल चिमोटे, राहुल गाठे, प्रशांत गोरले, सचिन काळे, आबा कळसकर, विलास काळे, राजेंद्र गोरले, दिनेश वानखडे, विजय मडघे उपस्थित होते.