पोस्टकोविड ‘म्युकरमायकोसिसचे’ जिल्ह्यात ३१ बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2021 04:12 AM2021-05-23T04:12:14+5:302021-05-23T04:12:14+5:30

गजानन मोहोड अमरावती : चार महिन्यांपासून सुरू असलेल्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत पुन्हा संकट ओढावले आहे. कोरोनाच्या गंभीर संसर्गानंतर बरे ...

31 victims of postcovid ‘mucormycosis’ district | पोस्टकोविड ‘म्युकरमायकोसिसचे’ जिल्ह्यात ३१ बळी

पोस्टकोविड ‘म्युकरमायकोसिसचे’ जिल्ह्यात ३१ बळी

Next

गजानन मोहोड

अमरावती : चार महिन्यांपासून सुरू असलेल्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत पुन्हा संकट ओढावले आहे. कोरोनाच्या गंभीर संसर्गानंतर बरे झालेल्या काही रुग्णांना पुन्हा ‘म्युकरमायकोसिस’ या पोस्ट कोविड आजाराचा सामना करावा लागत आहे. यात दोन ते तीन महिन्यांत तब्बल ३१ रुग्णांचा मृत्यू व ४५ टक्के मृत्य दराची नोंद झालेली आहे. ही संख्या राज्यात सर्वात जास्त असल्याची धक्कादायक माहिती आहे.

कोरोना उपचारानंतर बरे झालेल्या रुग्णांमध्ये आता डोळे आणि नाकाच्या इन्फेक्शनमध्ये वाढ झाल्याचे दिसून येत आहे. हा ‘म्युकरमायकोसिस’चा आजार आहे. काळ्या बुरशीचा आजार या नावानेही तो ओळखला जात आहे. यापूर्वी नाक, कान, घसा व नेत्रतज्ज्ञांकडे क्वचितच या रुग्णांची नोंद व्हायची. मात्र, अलीकडे रोज किंवा एक दिवसाआड एक तरी रुग्ण उपचाराला येत असल्याची माहिती तज्ज्ञांनी दिली. कोरोना संसर्गात सहव्याधीचे आजार असलेल्या रुग्णांमध्ये या आजाराचे रुग्ण अधिक असल्याचे सांगण्यात आले.

येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात एक महिन्यापूर्वी ‘म्युकरमायकोसिस’ या आजाराच्या रुग्णांसाठी एक वाॅर्ड तयार करण्यात आलेला आहे. या वार्डात २० बेड आहेत. सद्यस्थितीत १० रुग्णांवर उपचार सुर आहे. याशिवाय शहरात अनेक रुग्णालयात या आजाराचे रुग्ण उपचारार्थ दाखल आहेत. शासन, प्रशासन स्तरावर या आठ-दहा दिवसांत हा आजार गंभीरतेने घेण्यात आला. जिल्हा प्रशासनाद्वारा चार दिवसांत या आजाराविषयी बैठकी व कार्यशाळा होत आहे. मात्र, शहरात किंवा जिल्ह्यात या आजाराचे नेमके किती रुग्ण आहेत, याविषयीची माहिती आरोग्य यंत्रणा ठामपणे सांगू शकत नाही. नाक, कान घसा व नेत्र तज्ज्ञांकडे ‘लोकमत’ने विचारणा केली असता किमान ५०० वर रुग्ण सध्या उपचार घेत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली.

पाईंटर

म्युकरमायकोसिसची जिल्हास्थिती

एकूण रुग्णसंख्या : ६६

उपचारानंतर बरे : २३

मृत्यू झालेले रुग्ण : ३१

उपचार सुरू रुग्ण : १२

बॉक्स

राज्यात ९०, जिल्ह्यात ३१ मृत्यू

‘म्युकरमायकोसिस’ आजाराने राज्यात आतापर्यंत ९० मृत्यू झाल्याची नोंद आहे. यात सर्वाधिक ३१ मृत्यू अमरावती जिल्ह्यात झालेले आहे. या आजाराला अधिसूचित आजारात्या यादीत टाकण्याच्या सूचना केंद्र शासनाने दिल्या असल्या तरी अद्याप राज्याच्या आरोग्य विभागाद्वारे तसे आदेश जारी केलेले नसल्याची माहिती जिल्हा आरोग्य विभागाने दिली.

बॉक्स

जिल्हा प्रशासनाची आता लगबग

शासनस्तरावर या आजाराला गंभीरतेने घेण्यात आल्यानंतर आता कुठे जिल्हा प्रशासनाला जाग आलेली आहे. दोन दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी या आजारासंदर्भात शहरातील खासगी डॉक्टरांची बैठक घेतली. याशिवाय शनिवारी या आजारासंदर्भात याच डाॅक्टरांची कार्यशाळा घेण्यात आल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.

बॉक्स

खासगी डॉक्टरांना मागितला अहवाल

शहरातील फिजिशीयन तसेच नाक, कान, घसा व नेत्र तज्ञ डॉक्टरांकडे आतापर्यत ‘म्युकर मायकोसिस’ आजाराच्या किती रुग्णांनी उपचार घेतला याविषयीची माहिती मागण्यात आल्याचे महापालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ विशाल काळे यांनी यांनी ‘लोकमत’शी बोलतांना सांगितले. याशिवाय खासगी डॉक्टरांकडून माहिती घेवून सीएस कार्यालयाद्वारा साप्ताहिक अहवाल केल्या जात आहे.

बॉक्स

डॉक्टरांचे प्रिस्किप्शनशिवाय स्टेरॉईड नाही

कोरोना रुग्णांवर उपचार करतांना डॉक्टरांनी स्टेरॉईडचा अनावश्यक वापर टाळावा. जिथे आवश्यकता म्हणून तसे उपचार केले असतील, तिथे रुग्णांना वेळीच माहिती देणे, त्यावर देखरेख ठेवणे हेही आवश्यक आहे. स्टेरॉईडचा अनियंत्रित वापर रोखण्यासाठी एफडीएने संनियंत्रण करावे. औषध विक्रेत्यांनीही डॉक्टरांचे प्रिस्किप्शन असल्याशिवाय स्टेरॉईड देऊ नये, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.

बॉक्स

काय आहे ‘म्युकर मायकोसीस’?

म्युकरमायसेटीस नावाच्या बुरशीमुळे हा संसर्ग होतो. जेव्हा मानवी शरीराची प्रतिकारशक्ती कमी होते अशावेळेस म्युकरमायकोसीसची लागण होते. या बुरशीचा कण श्वासाद्वारे शरीरात गेल्यावर फुफ्फुस आणि सायनसवर दुष्परिणाम होतो. प्रतिकारशक्ती कमी असलेली व्यक्ती, इतर दिर्घकालीन आजार मुख्यतः मधुमेह औषधोपचार, कर्करोग पीडित रुग्ण यांना ह्या आजाराची लागण होताना दिसून येते.

बॉक्स

म्यकर मायकोसिसची लक्षणे

डोके दुखणे, चेहऱ्याला सूज येणे, ताप येणे, तोंडामध्ये गळू येणे व त्यामधून पू येणे, दातातून पू येणे, दात हलणे जबड्याचे हाड उघडे पडणे, हिरड्यांना सूज येणे व त्यातून रक्त येणे, सायनसेसमध्ये रक्तसंचय आढळणे, डोळ्यांना सूज येणे व हालचाल कमी होणे, चेहऱ्याची त्वचा काळी पडणे, अस्पष्ट दिसणे, नाकात काळा, सुका मळ तयार होणे, दात काढल्यानंतर न भरणारी जखम इत्यादी लक्षणे दिसून येतात. ही लक्षणे आढळल्यास दंत अथवा मुख आरोग्य तज्ञांकडून त्वरित सल्ला घेणे आवश्यक आहे

बॉक्स

अॅम्फोटेरोसीन -बी इंजेक्शनचा तुटवडा

जिल्ह्यात म्युकर मायकोसिस आजाराचे रुग्ण वाढताच त्यावर प्रभावी असणाऱ्या ‘अॅम्फोटेरोसीन -बी’ इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झालेला आहे. कुठल्याही मेडीकलमध्ये हे इंजेक्शन उपलब्ध नाही. रेमेडिसिविर प्रमाणे या इंजेक्शनवर आता जिल्हा प्रशासनाचे नियंत्रण राहणार असल्याचे जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी बोलतांना सांगितले.

कोट

०००००००००००००

०००००००००००

शैलेश नवाल

जिल्हाधिकारी

कोट

००००००००००००

००००००००००००००००

डॉ श्यामसुंदर निकम

जिल्हाशल्य चिकित्सक

Web Title: 31 victims of postcovid ‘mucormycosis’ district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.