राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये ३१३ प्रकरणे निकाली; ८५६१९९५ रुपये रक्कम वसूल

By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2024 11:23 AM2024-08-03T11:23:52+5:302024-08-03T11:25:00+5:30

जिल्हा न्यायालय, विधी सेवा समिती: तडजोडीतून प्रकारणे निकाली

313 cases solved in National People's Court; Rs 85,61,995 amount recovered | राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये ३१३ प्रकरणे निकाली; ८५६१९९५ रुपये रक्कम वसूल

313 cases solved in National People's Court; Rs 85,61,995 amount recovered

लोकमत न्यूज नेटवर्क
वरूड :
स्थानिक जिल्हा न्यायालय-१ व अतिरिक्त सत्र न्यायालयामध्ये राष्ट्रीय लोकअदालतीचे जिल्हा न्यायालय-१ व अतिरिक्त सत्र न्यायालय आणि तालुका विधी समितीच्यावतीने शनिवारी आयोजन करण्यात आले होते. यामध्ये तडजोडीने ३१३ प्रकारणे निकाली काढण्यात येऊन ८५ लाख ६१ हजार ९९५ रुपये रक्कम वसूल करण्यात आले.


राष्ट्रीय लोकअदालतीच्या पॅनल क्र. १ चे प्रमुख न्यायाधीश असलेले जिल्हा न्यायाधीश ए. सी. आवटे, पॅनल वकील अधिवक्ता व्ही. जी. बघेले, कर्मचारी एस. एस. साहू, एस. आर. वाट, आर. आर. राऊत, एम. बी. वाघमारे यांनी काम पाहिले, तर पॅनल क्र. २ वर पॅनलप्रमुख दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर एस. पी. लंकेश्वर, पॅनल वकील पी. बी. कोल्हारे, कर्मचारी एस. आर. मुकवाने, एन. एम. इंगळे, एन. डब्ल्यू, धुळे, डी. एम. रोहिले, आर. बी. शियाले, आर. बी. घडेकर, आर. जी. मलवार, ए. पी. मोहोड, ए. एन. इंगळे, एच. एस. गजभिये यांनी काम पाहिले. लोकअदालतीमध्ये पॅनल क्र.१ मध्ये न्यायालयीन तडजोड पात्र ४६६ खटले ठेवण्यात येऊन १०५ खटले निकाली निघाले. यामध्ये तडजोड रक्कम ५४ लाख १४ हजार ७६२ रुपये रक्कम वसूल झाली. पॅनल क्र.२ मध्ये पूर्व तडजोडपात्र खटले एकूण ४२९२ ठेवण्यात आले होते. त्यापैकी एकूण २११ प्रकरणे निकाली काढण्यात आली. यामध्ये तडजोड रक्कम ३१ लाख ४७ हजार २३३ रुपये वसूल झाली.


एकूण ३१३ तडजोड खटले निकाली निघाले. यामध्ये तडजोड रक्कम ८५ लाख ६१ हजार ९९५ रुपये रक्कम वसूल करण्यात आली. राष्ट्रीय लोकअदालतीचे कामकाज अधीक्षक आर. बी. वानखडे, सहायक अधीक्षक एस. के. अंबलकार, आर. व्ही. पाटील, आर. डी. पानडे, सी. व्ही. पाठकसह न्यायालयीन कर्मचारी तसेच तालुका विधी समितीच्या सदस्यांनी पार पाडले.
 

Web Title: 313 cases solved in National People's Court; Rs 85,61,995 amount recovered

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.