२५५ गावांना अधिग्रहणातील ३१४ विहिरींचा आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2019 01:31 AM2019-06-06T01:31:04+5:302019-06-06T01:31:22+5:30

सरासरीपेक्षा कमी पावसामुळे जून महिन्यात ३५० गावांमध्ये पाण्याची टंचाई आहे. सद्यस्थितीत ५५ गावांमधील एक लाख दोन हजार नागरिकांची ५४ टँकरवर मदार आहे. पाणीटंचार्ईवर तात्पुरता उपाय म्हणून ३१४ खासगी विहिरींचे अधिग्रहण केले, त्यावर २५५ गावांची तहान भागविली जात आहे.

315 wells in the acquisition of 255 villages | २५५ गावांना अधिग्रहणातील ३१४ विहिरींचा आधार

२५५ गावांना अधिग्रहणातील ३१४ विहिरींचा आधार

Next
ठळक मुद्देटंचाईची दाहकता वाढली : एक लाख नागरिकांची भागवितात ५४ टँकर तहान

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : सरासरीपेक्षा कमी पावसामुळे जून महिन्यात ३५० गावांमध्ये पाण्याची टंचाई आहे. सद्यस्थितीत ५५ गावांमधील एक लाख दोन हजार नागरिकांची ५४ टँकरवर मदार आहे. पाणीटंचार्ईवर तात्पुरता उपाय म्हणून ३१४ खासगी विहिरींचे अधिग्रहण केले, त्यावर २५५ गावांची तहान भागविली जात आहे. प्रशासनाने यंदा कृती आराखड्यात १९३८ उपाययोजना सुचविल्या होत्या. त्यापैकी ३३० पूर्ण झालेल्या आहेत. जिल्हा प्रशासनाच्या नियोजनाच्या अभावानेच जलसंकट वाढले असल्याचा आरोप होत आहे.
गतवर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने भूजल पातळीत घट झाली. गावागावांतील जलस्त्रोत आटल्यामुळे पाणीपुरवठ्याच्या योजना बंद पडल्या आहेत. यावर उपाय म्हणून जिल्हा प्रशासनाद्वारा ३१४ खासगी विहिरींचे अधिग्रहण केले आहे, तर ५५ गावांमध्ये ५४ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. सद्यस्थितीत अमरावती तालुक्यातील बोडना, परसोडा, डिगरगव्हाण, मोर्शी तालुक्यात शिरखेड, अंबाडा, सावरखेड, लेहगाव, वाघोली, आसोना, पोरगव्हाण, पिंपळखुटा (मोठा) शहापूर, दहसूर, गोराळा, आखतवाडा चांदूर रेल्वे तालुक्यात आमला विश्वेश्वर, जळका जगताप, सालोरा, कारला, सावंगी मग्रापूर, निमला, आमदोरी, धामणगाव रेल्वे तालुक्यात उसळगव्हाण, तिवसा तालुक्यात कुºहा, ठाणाठुणी, भारवाडी, गुरूदेवनगर, मोझरी, वरखेड, तारखेड, सार्सी, चिखलदरा तालुक्यात भंग, आडनदी, भिलखेड, कोयलारी, पाचडोंगरी, धरमडोह, बहाद्दरपूर, सोनापूर, पिपादरी, कोरडा हनुमान, ढाना, कोरडा गवळी, भादरी, तारूबांदा, लवादा, भांद्री, कुलगंना, घौलखेडा बाजार, धारणी तालुक्यात ढोमणाढाणा, बुलूमगव्हाण, मलकापूर, खिरपाणी, खडीमल, सोमवारखेडा, अचलपूर तालुक्यात पथ्रोट, चांदूर बाजार तालुक्यात घाटलाडकी येथे सद्यस्थितीत टँकरद्वारे पाण्याचा पुरवठा होत आहे. मागील आठवड्यात ४९ टँकर सुरू होते. मात्र, टंचार्ईची तीव्रता वाढल्याने एका आठवड्यात ५ टँकर वाढले आहेत. गतवर्षी अधिकतम १४ टँकरने पाणीपुरवठा करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयातील नियंत्रण कक्षाच्या व्ही.आर. उगले, हरीश खरबडकर यांनी दिली.

उर्ध्व वर्धा प्रकल्पात १४ टक्केच साठा
यंदा जिल्ह्यातील ८५ प्रकल्पांत सद्यस्थितीत १४० दलघमी (१४ टक्केच) साठा आहे. गतवर्षी याच दिनांकाला २७५ दलघमी म्हणजेच २८ टक्के साठा शिल्लक होता. सन २०१४ मध्ये २१०, सन २०१५ मध्ये १७०, सन २०१६ मध्ये १२०, तर सन २०१७ मध्ये २१४ दलघमी साठा शिल्लक होता. यंदा सरासरीपेक्षा कमी झाल्याने ही स्थिती ओढावली आहे. विशेष म्हणजे मध्यप्रदेशातदेखील कमी पाऊस झाल्याने एकमेव मुख्य प्रकल्प असलेल्या उर्ध्व वर्धा प्रकल्पात सध्या १४ टक्केच साठा शिल्लक आहे.

तालुकानिहाय खासगी विहिरींचे अधिग्रहण
पाणीटंचार्ईवर तात्पुरता ईलाज म्हणजे खासगी विहिरींचे अधिग्रहण, जिल्ह्यात सद्यस्थितीत २५५ गावांमध्ये ३१४ खासगी विहिरींचे अधिग्रहण करण्यात आलेले आहे. यामध्ये सर्वाधिक ५७ विहिरी चांदूर रेल्वे तालुक्यात आहेत. अमरावती ४५, नांदगाव खंडेश्वर ३२, भातकुली १, तिवसा २०, मोर्शी ४६, वरूड ३४, धामणगाव रेल्वे १२, अचलपूर ३०, चांदूरबाजार ८, चिखलदरा १०, धारणी १२ व अंजनगाव सुर्जी तालुक्यात ७ खासगी विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहेत.

Web Title: 315 wells in the acquisition of 255 villages

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.