३१७ ईटीआयएम मशीन भंगार, लालपरीत ६७० तिकीट मशिनचा वापर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2021 04:13 AM2021-07-29T04:13:44+5:302021-07-29T04:13:44+5:30
अमरावती : एसटी महामंडळानेही आधुनिकतेकडे वळत तिकीट काढण्यासाठी ईटीआयएम मशीनचा वापर सुरू केला आहे. परंतु अमरावती विभागाकडे असलेल्या ...
अमरावती : एसटी महामंडळानेही आधुनिकतेकडे वळत तिकीट काढण्यासाठी ईटीआयएम मशीनचा वापर सुरू केला आहे. परंतु अमरावती विभागाकडे असलेल्या ९९८ पैकी ६७० वापरात आहेत. ३७१ मशीन नादुरुस्ती आहेत. त्यामुळे या ईटीआयएम मशीन भंगार झाल्या आहेत. काही तिकीट मशिन खराब झाल्या असल्या तरी ट्रेचा वापर नसल्याची स्पष्टोक्ती स्थानिक एसटी प्रशासनाने दिली.
राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी बसेसमध्ये वाहक तिकीट काढण्यासाठी काही वर्षांपासून ईटीआयएम मशिनचा वापर करीत आहे. मात्र, या मशीन अचानक बंद पडणे, त्याची चार्जिंग उतरणे, अक्षरे स्पष्ट न दिसणे अशी समस्या वाढली आहे. जिल्ह्यातील ८ एसटी आगारासाठी ९९८ ईटीआयएम मशीन पुरविण्यात आल्या होत्या. त्यापैकी ६७० वापरात आहेत. ३७२ मशीन नादुरुस्त आहेत. त्यामुळे कमी मशिनवरच तिकीट काढण्यासाठी वापर होत आहे. परिणामी नादुरूस्त मशिन दुरुस्तीसाठी पैशाची वानवा आहे.
बॉक्स
जिल्ह्यातील एकूण एसटी बसेस -३७१
सध्या सुरू असलेल्या बसेस-२५०
तिकीट काढण्याचे एकूण इलेक्ट्रॉनिक मशीन -९९८
सध्या बंद असलेल्या इलेक्ट्रॉनिक मशीन - ६७०
बॉक्स
काय म्हणते आकडेवारी
आगार इलेक्ट्रॉनिक मशीन वापरात बिघाड
अमरावती १०७ ११० ४६
बडनेरा ८९ ५२ ३७
परतवाडा १७८ ११९ ५७
चांदुर बाजार १०१ ७१ २९
मोर्शी १०४ ७३ २८
वरुड १२५ ९१ ३३
चांदुर रेल्वे १०० ६५ ३४
दयार्पूर १४४ ८९ ५३
बॉक्स
दुष्काळात तेरावा महिना
कोरोना काळात एसटीच्या उत्पन्नावर मोठा परीणाम झाला आहे .रात्रराणी बसलेल्या बंद असून ग्रामीण भागातील फेऱ्यांची संख्या कमी आहे. परिणामी एसटीचे उत्पन्नात मोठ्या प्रमाणात घट आली आहे.अशाच मालवाहतुकीचा एसटी महामंडळाला मोठा आधार होत असल्याचे दिसते.
बॉक्स
पगार मिळतोय हेच नशीब
बससेवा सुरू झाली असली तरी ग्रामीण भागातील बाजूंनी बंद आहेत. लांब पल्ल्याच्या बसेस सध्या सुरू झाल्या आहेत. त्यामुळे टप्प्याटप्प्याने कर्मचाऱ्यांची ड्युटी लागत असून जितके दिवस ड्युटी तितक्याच दिवसाचा पगार दिला जातो.
बॉक्स
वाहकाकडून आकड्यांची जुळवाजुळव
मशिन तांत्रिक कारणामुळे बंद पडतात. काही मशिनमध्ये डिप्ले रात्रीच्या वेळी स्पष्टपणे न दिसल्यामुळे वाहकांना तिकिटासाठी जुळवाजुळव करावी लागते.
कोट
स्थानिक एसटी महामंडळाकडे ९९८ ईटीआयएम मशिन आहेत.त्यापैकी ७६० मशिनचा वापर केला जात आहे.मात्र ३१७ मशिन नादुरूस्त असल्याने त्याचा वापर केला जात नाही. तिकिटासाठी ट्रेचा वापर जिल्ह्यातील कुठल्याच आगारात केला जात नाही.
- श्रीकांत गभणे,
विभाग नियंत्रक