३२ पुनर्वसितांवर गुन्हे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2018 12:54 AM2018-01-19T00:54:13+5:302018-01-19T00:54:25+5:30

मेळघाट व्याघ्र प्रकल्पांतर्गत सोमठाणा बु. येथे पुनर्वसितांनी वनाधिकारी, कर्मचाऱ्यांवर जीवघेणी हल्ले केल्याप्रकरणी चिखलदरा ठाण्यात ३२ जणांविरुद्ध फौजदारी गुन्हे नोंदविले आहे. गावकऱ्यांकडून कुऱ्हाडी, विळे, लोखंडी साहित्य जप्त करण्यात आल्याची माहिती मेळघाट व्याघ्रचे क्षेत्रसंचालक एम.एस.रेड्डी यांनी दिली.

32 Crime Against Researchers | ३२ पुनर्वसितांवर गुन्हे

३२ पुनर्वसितांवर गुन्हे

Next
ठळक मुद्देआरोप : वनाधिकाºयांवरील हल्ला प्रकरण

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : मेळघाट व्याघ्र प्रकल्पांतर्गत सोमठाणा बु. येथे पुनर्वसितांनी वनाधिकारी, कर्मचाऱ्यांवर जीवघेणी हल्ले केल्याप्रकरणी चिखलदरा ठाण्यात ३२ जणांविरुद्ध फौजदारी गुन्हे नोंदविले आहे. गावकऱ्यांकडून कुऱ्हाडी, विळे, लोखंडी साहित्य जप्त करण्यात आल्याची माहिती मेळघाट व्याघ्रचे क्षेत्रसंचालक एम.एस.रेड्डी यांनी दिली.
अकोट वन्यजीव अभयारण्यांतर्गत आठ गावांचे पुनर्वसन केले. मात्र, २५ डिसेंबर रोजी अवैधरीत्या अतिसंरक्षित क्षेत्रात वनांमध्ये प्रवेश करून त्यांनी मूळ गावात ठिय्या मांडला. सोमठाणा बु. येथील पुनर्वसित गावात गावकऱ्यांनी अवैधरीत्या पाळीव प्राणी आणल्याची माहिती वनविभागाला मिळताच त्यांना बाहेर काढण्यास गेलेले वनाधिकारी, कर्मचाऱ्यांवर जीवघेणी हल्ला चढविला.
नागरतास येथे रविवारी पाणवठ्याजवळ रानगवा मृतावस्थेत आढळला. विषप्रयोगाने तो मारला गेला, असा कयास आहे. हे कृत्य अवैधरित्या जंगलात प्रवेश केलेल्या गावकऱ्यांनी केले असावे, असा अंदाज वनविभागाचा आहे. त्यानंतर विशेष संरक्षण दलाने धारगड, गुल्लरघाट, बारूखेडा, नागरतास येथे सर्च आॅपरेशन राबविले. गावकऱ्यांकडून कुऱ्हाडी, विळे, घमेले, पावडे, सळाखी जप्त केले.

Web Title: 32 Crime Against Researchers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.