१३ लाखांच्या प्रलोभनापोटी गमावले ३२ हजार; ऑनलाईन फसवणूक

By प्रदीप भाकरे | Published: June 20, 2023 01:03 PM2023-06-20T13:03:06+5:302023-06-20T13:04:07+5:30

प्रथम क्रमांकाच्या बक्षिसाची बतावणी

32 thousand lost to temptation of 13 lakhs amid online fraud | १३ लाखांच्या प्रलोभनापोटी गमावले ३२ हजार; ऑनलाईन फसवणूक

१३ लाखांच्या प्रलोभनापोटी गमावले ३२ हजार; ऑनलाईन फसवणूक

googlenewsNext

अमरावती : कंपनीकडून १२ लाख ६० हजार रुपयांचे प्रथम बक्षिस मिळाल्याची बतावणी करून एका महिलेला ३१ हजार ६४१ रुपयांनी ऑनलाईन गंडा घालण्यात आला. ३० सप्टेंबर २०२२ ते १ ऑक्टोबर २०२२ दरम्यान ती फसवणुकीची घटना घडली. याप्रकरणी, फ्रेजरपुरा पोलिसांनी १९ जून रोजी दुपारी अज्ञात आरोपीविरूद्ध गुन्हा दाखल केला.            

तक्रारीनुसार, एका महिलेच्या मोबाईलवर ३० सप्टेंबर २०२२ रोजी अज्ञात आरोपीने कॉल करून तुम्हाला एका कंपनीकडुन प्रथम क्रमांकाचे बक्षीस मिळाल्याची बतावणी केली. त्या आरोपीने महिलेला कंपनीची लिंक, कंपनीची आय डी पुफ, आधार कार्ड व पॅन कार्ड व्हाॅट्सॲपवर पाठवले. तिला विश्वासात घेवुन रजिस्ट्रीे फी म्हणून ३५०० रुपये भरण्यास सांगितले. त्यानंतरच तुमच्या खात्यावर १२ लाख ६० हजारांचा चेक जमा होईल असे सांगितले. टिडीएस भरल्याशिवाय चेक अंकाउंट क्रेडीट केल्या जाणार नाही. आरोपी मोबाईल क्रमांक धारकाने स्वत:चे नाव पंकज सिंग भारतीय असे सांगितले.

महिलेला विश्वासात घेऊन १०,१५६ रूपये फोन पे द्वारे भरण्यास सांगितले. ती रक्कम महिलेने पाठविली. त्यानंतर पुन्हा त्याच आरोपींनी आरबीआयकडून चेक व्हेरिफाय करून द्यावा, त्यासाठी चेक व्हेरिफिकेशन चार्ज भरावे लागतील, अशी बतावणी केली. त्यामुळे त्या महिलेने एसबीआय ग्राहक सेवा केंद्रातून १७ हजार ९८५ रूपये आरोपीच्या खात्यात ऑनलाईन भरले. मात्र त्यानंतरही पैशाची मागणी सुरूच राहिल्याने आपली फसवणूक झाल्याचे तिच्या लक्षात आले. त्यामुळे तिने सायबर पोलीस ठाणे गाठले. तेथून तिचा अर्ज फ्रेजरपुरा पोलीस ठाण्यात धाडण्यात आला.

Web Title: 32 thousand lost to temptation of 13 lakhs amid online fraud

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.