मध्य रेल्वेत सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी ३२ जलशुद्धिकरण केंद्र

By गणेश वासनिक | Published: June 20, 2023 02:24 PM2023-06-20T14:24:39+5:302023-06-20T14:25:17+5:30

गोड्या पाण्याच्या वापरात ६.३ टक्के झाली कपात; रेल्वे ट्रॅक धुणे, स्टेशनचे मजले पुसण्यासाठी पाण्याचा वापर

32 water treatment plants to treat sewage in Central Railway | मध्य रेल्वेत सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी ३२ जलशुद्धिकरण केंद्र

मध्य रेल्वेत सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी ३२ जलशुद्धिकरण केंद्र

googlenewsNext

अमरावती : मध्य रेल्वेने सांडपाणी आणि सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी ३२ हून अधिक जलशुद्धीकरण संयंत्रे उभारली आहे. यात दररोज एक कोटी लिटरपेक्षा जास्त पाण्यावर प्रक्रिया केली जाते. त्यामुळे वाढत्या जलसंकटावर शाश्वत उपाय म्हणून हे केंद्र उपयाेगी ठरत आहेत. तसेच प्रदूषित पाण्याचा पर्यावरणातील विसर्ग दूर करते. हे प्रक्रिया केलेले पाणी नंतर ट्रॅक धुणे, स्टेशनचे मजले पुसणे यासह स्वच्छतेसाठी वापरले जाते.

मध्य रेल्वेचा पर्यावरण आणि घर-संरक्षण व्यवस्थापन विभाग विविध उपाययोजनांद्वारे पर्यावरणीय शाश्वतता लक्ष्य साध्य करण्यासाठी अथक प्रयत्न करीत आहे. जलसंधारणाच्या संदर्भात राष्ट्रीय हरित न्यायाधिकरण आणि रेल्वे बोर्डाने जारी केलेल्या नियमांनुसार सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यात येत आहे. सांडपाण्यावर प्रक्रिया केल्यानंतरचा पाण्याचा पुर्नवापर हा पिण्यायोग्य कारणांसाठी किंवा स्वयंपाक करण्यासाठी केला जात नाही, ही बाब रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केली आहे.

मध्य रेल्वेत सन २०२२ मध्ये १५७५ किलोलिटर प्रतिदिन केएलडी पाणी तयार करण्याच्या क्षमतेसह १० नवीन जलशुद्धीकरण प्रकल्प कार्यान्वित करण्यात आले आहेत. जलसंधारणाच्या या व्यापक उपाययोजनांमुळे मध्य रेल्वेने ताज्या पाण्याच्या वापरामध्ये ६.३ टक्क्याची ची घट नोंदवली आहे. संपूर्ण झोनमधील प्रमुख उपभोग केंद्रांवर जल लेखापरीक्षण आणि बचत प्रक्षेपणांद्वारे जलसंपत्तीचे संरक्षण करण्यात पुढे असल्याचे भुसावळ येथील रेल्वे जनसंपर्क अधिकाऱ्यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

येथे बसविण्यात आले जलशुद्धिकरण केंद्र
• लोकमान्य टिळक टर्मिनस येथे प्रत्येकी १२० केएलडी क्षमतेचे २ वॉटर रिसायकलिंग प्लांट
• अहमदनगर येथे ५० केएलडी क्षमतेचा सांडपाणी प्रक्रिया केंद्र
• नाशिक रोड येथे २०० केएलडी क्षमतेचे केंद्र
• अकोला येथे ५०० केएलडी क्षमता
• खांडवा येथे ५०० केएलडी क्षमता
• कोपरगाव येथे १५ केएलडी क्षमता
• सोलापूर येथे १५ केएलडी क्षमता
• अजनी, नागपूर येथे ४० केएलडी क्षमता
• साईनगर शिर्डी येथे १५ केएलडी क्षमतेचा प्रकल्प

Web Title: 32 water treatment plants to treat sewage in Central Railway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.