५८ हजार शेतकऱ्यांना ३२६ कोटींची कर्जमाफी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2017 10:30 PM2017-12-27T22:30:40+5:302017-12-27T22:31:22+5:30

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत जिल्ह्यातील ५८ हजार ५१३ शेतकऱ्यांना ३२६ कोटी ५१ लाख ९८ हजारांच्या कर्जमाफीचा लाभ देण्यात आला.

326 crores of loan to the 58 thousand farmers | ५८ हजार शेतकऱ्यांना ३२६ कोटींची कर्जमाफी

५८ हजार शेतकऱ्यांना ३२६ कोटींची कर्जमाफी

Next
ठळक मुद्देबँकांकडे वर्ग : जिल्हा बँकेकडे ३२,४०० शेतकऱ्यांची यादी पडताळणीला

आॅनलाईन लोकमत
अमरावती : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत जिल्ह्यातील ५८ हजार ५१३ शेतकऱ्यांना ३२६ कोटी ५१ लाख ९८ हजारांच्या कर्जमाफीचा लाभ देण्यात आला. या आठवड्यात पुन्हा जिल्हा बँकेकडे ३२,४०० शेतकऱ्यांच्या याद्या पडताळणीसाठी पाठविल्या आहेत. प्रोत्साहनपर लाभ मिळणाऱ्या १३ हजार लाभार्थ्यांच्या याद्या तूर्त माघारल्या आहेत.
दोन महिन्यांपासून तात्पुरत्या पात्र शेतकऱ्यांच्या याद्या पडताळणीची प्रक्रिया युद्धस्तरावर सुरू आहे. सहकार विभाग व बँकेच्या पडताळणीअंती याद्या आयटी विभागाला पाठविण्यात येत आहे. नव्या सॉफ्टवेअरनुसार एक लाख चार हजार शेतकºयांच्या याद्या पडताळणीनंतर अपलोड करण्यात आल्यात. गेल्या दोन महिन्यांपासून कर्जमाफीच्या लाभार्थ्यांच्या याद्या अपडेशनचे काम सहकार विभाग व जिल्हा बँकेद्वारा युद्धस्तरावर सुरू आहे. यामध्ये शासन निकषानुसार पहिल्या टप्प्यात बँकांचे थकबाकीदार शेतकऱ्यांमधून निकषपात्र लाभार्थी, दुसऱ्या टप्प्यात पडताळणी करून निकषपात्र लाभार्थ्यांची यादी अपलोड करणे, तिसऱ्या टप्प्यात सहकारी संस्थांसह इतर पदाधिकारी वगळून त्यांची नावे अपात्रतेच्या यादीत समाविष्ट करणे आदी प्रक्रिया आतापर्यंत सुरू होती. एकूण ७४९ संस्थांच्या पात्र एक लाख चार हजार २१८ लाभार्थ्यांच्या याद्या आयटी विभागाकडे अपलोड केल्यात. राष्ट्रीयीकृत बँकांच्या याद्या त्या-त्या शाखांच्या मुख्य कार्यालयाद्वारा अपलोड करण्यात आल्याची एकीकृत माहिती उपलब्ध होऊ शकली नाही.
अशी आहे बँकानिहाय रक्कम वर्ग
जिल्हा बँकेत २६,०८६ शेतकऱ्यांना१०९.९२ कोटी रूपयांच्या कर्जमाफीचा लाभ देण्यात आला. बँक आॅफ बडोदाच्या १०९ खातेदारांना ५०.८९ लाख, बँक आॅफ इंडियाच्या १४३४ खातेदारांना १२.५१ कोटी, बँक आॅफ महाराष्ट्रच्या ५७११ खातेदारांना ३५.२९ कोटी, कॅनरा बँकेच्या १२२ खातेदारांना ७६.३९ लाख, सेंट्रल बँक आॅफ इंडिया २६६० खातेदारांच्या १७.९८ कोटी, देणा बँकेच्या ३९ खातेदारांना ३५.७ लाख, इंडियन बँकेच्या ३०९ खातेदारांना२.५६ कोटी, एसबीआयच्या २०,२२६ खातेदारांना १३४.३८ कोटी, युको बँकेच्या १३ खातेदारांना ५ लाख, युनियन बँकेच्या १२१५ खातेदारांना ८.१३ कोटींची रक्कम वर्ग करण्यात आली.
कर्जमाफी वर्ग लाभार्थींची यादी पोर्टलवर
शासनाने कर्जमाफी दिलेल्या शेतकरी लाभार्थ्यांची यादी आता आयटी विभागाद्वारा ‘आपले सरकार’ पोर्टलवर टाकण्यात येणार आहे. यासाठी याद्यांची पडताळणी झाल्यानंतर ज्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात कर्जमाफीची रक्कम वर्ग करण्यात आलेली आहे. त्या शेतकऱ्यांची नावे नागरिकांच्या माहितीसाठी पोर्टलवर राहणार आहे. या विषयीच्या सूचना संबंधित विभागांना देण्यात आल्या आहेत.

Web Title: 326 crores of loan to the 58 thousand farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.