३३ समाजाच्या बांधवांनाही आरक्षण द्या, शासनाकडे मागणी
By admin | Published: June 29, 2014 11:43 PM2014-06-29T23:43:31+5:302014-06-29T23:43:31+5:30
महाराष्ट्रामध्ये ३३ समाज असे आहेत की, ज्याची लोकसंख्या अधिक आहे. त्यांनाही राज्य शासनाने आरक्षण लागू करावे, अशी मागणी आमदार रवी राणा यांनी निवेदनातून मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना केली आहे.
अमरावती : महाराष्ट्रामध्ये ३३ समाज असे आहेत की, ज्याची लोकसंख्या अधिक आहे. त्यांनाही राज्य शासनाने आरक्षण लागू करावे, अशी मागणी आमदार रवी राणा यांनी निवेदनातून मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना केली आहे.
राज्यामध्ये कोळी हलबा, महादेव कोळी, गोवारी, माना, ठाकूर, मन्नेरवालु, कोष्टी, छत्री, राजपूत, भामटा, धोबी, धनगर, बंजारा, राज, लिंगडोर, परजा, ओतारी, अंहिर, सुतार, काहार, कासार, भोई, बेलदार, बहुरुपी, कापेवार अशा ३३ समाज बाधवांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे.
त्यामुळे विधानसभेच्या निवडणुकीत मतदानाचा कौल निर्णयात्मक ठरु शकतो. त्यामुळे या ३३ समाजाच्या सवलतीच्या संदर्भातील मागण्या मंजूर कराव्यात, अशा मागणीचे निवेदन संघर्ष समितीचे उमेश ढोणे यांनी आमदार रवी राणा यांना दिले होते. याची दखल घेऊन आमदार रवी राणा यांनी त्या ३३ समाज बाधवांच्या मागण्यांसाठी मुख्यमंंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे निवेदन सादर करुन आरक्षणाची मागणी केली आहे.
हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी महाराष्ट्र शासनाचे मुख्य सचिव जे. एस. सहारीया यांंच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत आमदार राणा यांनी या ३३ समाजाच्या मागण्यांवर चर्चा केली होती. त्यावेळी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी या समाजाच्या विषयी आस्था दाखवून समस्या सोडविण्याचे आश्वासन दीले होते. मात्र अद्यापही प्रश्न सोडविल्या गेले नाही. त्यामुळे शासनाचे लक्ष वेधण्याकरीता पुन्हा आमदार राणा यांनी निवेदन सादर केले आहे. (प्रतिनिधी)