३३०० शेतकरी प्रतीक्षा यादीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2019 11:03 PM2019-03-18T23:03:53+5:302019-03-18T23:04:58+5:30
नाफेडद्वारे सुरू केलेल्या तूर खरेदी केंद्रात तालुक्यातील ३,५७८ शेतकऱ्यांनी आॅनलाइन नोंदणी केली. त्यापैकी दहा दिवसांत १०७ शेतकऱ्यांची १,४८३ क्विंटल तूर खरेदी करण्यात आली. त्यानंतर सोमवारपर्यंत दोन शेतकऱ्यांना तूर खरेदीसाठी संदेश पाठवविले. ३,३०० शेतकरी तूर विक्रीच्या प्रतीक्षेत आहे. ती खरेदी केव्हा होईल, याबाबत खविसंघ व शेतकरी साशंक आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदगाव खंडेश्वर : नाफेडद्वारे सुरू केलेल्या तूर खरेदी केंद्रात तालुक्यातील ३,५७८ शेतकऱ्यांनी आॅनलाइन नोंदणी केली. त्यापैकी दहा दिवसांत १०७ शेतकऱ्यांची १,४८३ क्विंटल तूर खरेदी करण्यात आली. त्यानंतर सोमवारपर्यंत दोन शेतकऱ्यांना तूर खरेदीसाठी संदेश पाठवविले. ३,३०० शेतकरी तूर विक्रीच्या प्रतीक्षेत आहे. ती खरेदी केव्हा होईल, याबाबत खविसंघ व शेतकरी साशंक आहेत.
नाफेडच्या खरेदी केंद्रावर तुरीला प्रतिक्विंटल ५,६७५ रुपये भाव आहे. तर खासगी बाजारात त्याच तुरीचे मोल ४७०० ते पाच हजारांच्या आसपास आहे. मात्र नाफेडकडे विकलेल्या तुरीचा आर्थिक मोबदला वेळेवर मिळत नसल्याने शेतकरी त्यांच्याकडील तूर नाईलाजाने खासगी व्यापाºयांना विकत आहेत. शेतकºयांना मुला-मुलींचे लग्न, शिक्षण, शेती मशागती व इतर व्यवहारासाठी नगदी रकमेची गरज असल्याने शेतकºयांची ससेहोलपट होत आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीत दररोज अडीचशे ते तीनशे पोती तूर विक्रीसाठी येत आहे.
नाफेड तूर खरेदीमध्ये ग्रेडिंग केले जाते. त्यात तुरीतील ओलावा, तुरीचा दर्जा तपासला जातो. नंतर तुरीला चाळणी मारली जाते. नाफेड तूर खरेदीसाठी एका लहान शेडमध्ये केवळ दोन मोजमाप काटे आहे. चाळणीखाली निघालेली तूर शेतकऱ्यांना घरी परत न्यावी लागते. दुसरीकडे आॅनलाईन अर्ज केलेल्या शेतकºयांची संख्या व प्रत्यक्षात तूर खरेदी केलेल्यांच्या संख्येत तफावत असल्याने खरेदी आणि आर्थिक मोबदला मिळेल तरी केव्हा, असा प्रश्न नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील शेतकºयांना पडला आहे.
मोर्शी-वरुडमध्ये तूर खरेदी रखडली
मोर्शी/ वरुड : तूर खरेदीतील कासवगती आता शेतकऱ्यांसाठी संताप आणणारी ठरली आहे. मोर्शी आणि वरुड तालुक्यातील २८२१ शेतकऱ्यांची तूर खरेदीविना पडून असल्याने मोबदला मिळेल तरी कधी, असा शेतकºयांचा प्रश्न आहे. मोर्शी तालुक्यात आॅनलाईन नोंदणी केलेल्या २४२२ पैकी ४६० शेतकऱ्यांची ५९७२ क्विंटल तूर खरेदी करण्यात आली. वरुडमध्ये १३१४ शेतकºयांनी आॅनलाईन नोंदणी केली. केवळ ४५५ शेतकऱ्यांची ५०१९ क्विंटल तूर खरेदी करण्यात आली. वरुडमध्ये शेतकºयांच्या नावावर व्यापारीच उखळ पांढरे करुन घेत असल्याची ओरड आहे. त्यातच तलाठ्यांनी संप पुकारल्याने आॅनलाईन सातबारा तर सोडा, हस्तलिखित देण्यासाठी तलाठी उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांची परवड होत आहे.
नाफेड तूर खरेदीसाठी आवश्यक आॅनलाईन नोंदणी क्रमांक २५९८ असा आहे. खरेदी कासवगतीने खरेदी सुरू असल्याने तुरीचे मोजमाप कधी होईल माहित नाही. प्रतीक्षा करण्याशिवाय गत्यंतर नाही.
- वसंतराव कडू, शेतकरी, येनस
तूर खरेदीसाठी बाजार समितीत आॅनलाईन नोंदणी केली. तो क्रमांक २४८१ असा आहे. तूर्तास केवळ ९५ शेतकऱ्यांच्या तुरीचे माप झाले. आमचा क्रमांक केव्हा लागणार?
- फिरोज खान अहमद खान
शेतकरी, नांदगाव खंडेश्वर