३३४ कर्मचाऱ्यांच्या तीन दिवसांत बदल्या

By admin | Published: May 16, 2017 12:11 AM2017-05-16T00:11:35+5:302017-05-16T00:11:35+5:30

जिल्हा परिषदेत मागील काही दिवसांपासून वर्ग तीन आणि चार मधील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बदल्यांची प्रक्रिया सुरू आहे.

334 transfers in three days of employees | ३३४ कर्मचाऱ्यांच्या तीन दिवसांत बदल्या

३३४ कर्मचाऱ्यांच्या तीन दिवसांत बदल्या

Next

झेडपीत हंगामा : कर्मचाऱ्यांमध्ये कही खुशी कही गम
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : जिल्हा परिषदेत मागील काही दिवसांपासून वर्ग तीन आणि चार मधील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बदल्यांची प्रक्रिया सुरू आहे. त्यानुसार मागील तीन दिवसात विविध विभागातील ३३४ कर्मचाऱ्यांच्या बदल्या प्रशासनाने केल्या आहेत. यामध्ये प्रशासकीय, विनंती व आपसी बदल्यांचा समावेश आहे.
आतापर्यंत बदल्या करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये पशुसंवर्धन विभागातील पशुधन विकास अधिकारी १, पशुधन पर्यवेक्षक १४ अशा एकूण १५, कृषी विभागामधील कृषी अधिकारी व विस्तार अधिकारी अशा प्रत्येकी १ याप्रमाणे २ बदल्या करण्यात आल्या आहेत.वित्त विभागात सहायक लेखाअधिकारी, कनिष्ठ लेखाधिकारी, कनिष्ठ सहायक लेखाधिकारी अशा १० बदल्या करण्यात आल्या आहेत. सिंचन मधील कनिष्ठ अभियंता व स्थापत्य अभियंता प्रत्येकी २ अशा चार, बांधकाममधील कनिष्ठ अभियंता व स्थापत्य अभियंत्यांच्या १३, महिला व बालकल्याण विभागातील पर्यवेक्षिका १५,पाणी पुरवठा विभागातील कनिष्ठ अभियंता १, पंचायत मधील विस्तार अधिकारी पंचायत७, ग्रामविकास अधिकारी ७ व ग्रामसेवक ४१ अशा ५५ बदल्या केल्या आहेत. सामान्य प्रशासन विभागातील सहायक प्रशासन अधिकारी ३, विस्तार अधिकारी सांख्यिकी ३, कनिष्ठ प्रशासन अधिकारी ६, कनिष्ठ सहायक १२, परिचर २९ अशा १०५, आरोग्य विभागातील आरोग्य पर्यवेक्षक ६, औषध निर्माण अधिकारी ११, आरोग्य सहायक महिला ९, आरोग्य सेवक महिला ४९, आरोग्यसेवक पुरूष २८ अशा ११४ बदल्या करण्यात आल्या आहेत. शिक्षण विभागातील विस्तार अधिकारी श्रेणी दोन व तीनमधील प्रत्येकी एक अशा दोन बदल्या करण्यात आल्या आहेत. यासर्व बदल्यांमध्ये प्रशासकीय, विनंती व आपसी बदल्यांचा समावेश आहे. जिल्हा परिषद प्रशासनाने तीन दिवसात एकूण ३३४ अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बदल्याची प्रक्रिया पूर्ण केली आहे. मात्र या बदली प्रक्रियेत जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांन मध्ये कही खुशी कही गमचे वातावरण असल्याचे चित्र दिसून आले आहेत.

मेळघाटात सेवा दिल्यासच आपसी बदली ?
सध्या बदली प्रक्रिया सुरू आहे. मात्र आपसी बदली मागणाऱ्या ग्रामसेवक, आरोग्य सेवक व अन्य संवर्गातील काही कर्मचाऱ्यांनी आपसी बदल्यासाठी प्रशासनाकडे रीतसर अर्ज केलेत. त्यानुसार सोमवारी आपसी बदली प्रक्रिये दरम्यान आपसी बदली मागणाऱ्या दोन्ही कर्मचाऱ्यांनी मेळघाटात सेवा दिली असेल तरच बदलीचा नवा फंडा प्रशासनाने काढला आहे. त्यामुळे आपसी बदलीपात्र कर्मचाऱ्यांनी सीईओकडे धाव घेऊन न्याय मागितला. परंतु प्रशासन आपल्या भूमिकेवर ठाम आहे. असा कुठलाही शासन नियम नसल्याचा दावा आपसी बदल्या मागणाऱ्या कर्मचाऱ्यांनी केला आहे.

Web Title: 334 transfers in three days of employees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.