कारंजा बहिरमच्या पंचशील आदिवासी आश्रमशाळेतील 34 मुलींना विषबाधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2022 11:39 PM2022-09-17T23:39:01+5:302022-09-17T23:39:29+5:30

सर्व बाधित मुलींना उलटी, पातळ शौचास, पोटदुखी, डोकेदुखीचा त्रास शुक्रवारी सायंकाळी जेवणानंतर जाणवायला लागला. सध्या या सर्व मुलींची प्रकृती स्थिर व धोक्याबाहेर आहे. यातील आठ मुलींना शनिवारी रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. पंचशील आदिवासी आश्रमशाळेत पहिली ते बारावीपर्यंत ५९७ विद्यार्थी आहेत. या सर्व मुला-मुलींनी शुक्रवारी सायंकाळी सोबतच जेवण घेतले. मुलांना कुठलाही त्रास जाणवला नाही, मात्र पहिली ते बारावीच्या निवडक ३४ विद्यार्थिनींनाच हा त्रास जाणवला.

34 girls of Karanja Bahiram's Panchsheel tribal ashram school were poisoned | कारंजा बहिरमच्या पंचशील आदिवासी आश्रमशाळेतील 34 मुलींना विषबाधा

कारंजा बहिरमच्या पंचशील आदिवासी आश्रमशाळेतील 34 मुलींना विषबाधा

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
परतवाडा : कारंजा बहिरम पंचशील आदिवासी आश्रमशाळेतील ३४ मुलींना शुक्रवारी सायंकाळी विषबाधा झाली. ही विषबाधा नेमकी कशातून झाली, याची अजूनपर्यंत स्पष्टता झालेली नाही. बाधित ३४ मुलींना शिक्षकांनी औषधोपचाराकरिता अचलपूर उपजिल्हा रुग्णालयात शुक्रवारी रात्रीलाच दाखल केले.
डॉक्टरांनी यातील २९ मुलींना उपजिल्हा रुग्णालयात भरती करून घेतले. एका मुलीला उपचारार्थ अमरावतीला पाठविले, तर चार मुलींना औषधोपचारानंतर लागलीच सुटी दिली. या सर्व बाधित मुलींना उलटी, पातळ शौचास, पोटदुखी, डोकेदुखीचा त्रास शुक्रवारी सायंकाळी जेवणानंतर जाणवायला लागला. सध्या या सर्व मुलींची प्रकृती स्थिर व धोक्याबाहेर आहे. यातील आठ मुलींना शनिवारी रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. पंचशील आदिवासी आश्रमशाळेत पहिली ते बारावीपर्यंत ५९७ विद्यार्थी आहेत. या सर्व मुला-मुलींनी शुक्रवारी सायंकाळी सोबतच जेवण घेतले. मुलांना कुठलाही त्रास जाणवला नाही, मात्र पहिली ते बारावीच्या निवडक ३४ विद्यार्थिनींनाच हा त्रास जाणवला. त्यामुळे नेमकी ही विषबाधा कशातून झाली, याविषयी अधिकृत माहिती उपलब्ध होऊ शकली नाही.
शिरजगाव पोलिसांनी नोंदविले बयाण
कारंजा बहिरम येथील पंचशील आदिवासी आश्रमशाळेतील मुलींना विषबाधा झाल्यानंतर शिरजगाव पोलिसांनी आश्रमशाळेतील अन्न व पाण्याचे नमुने ताब्यात घेतले आहेत. हे नमुने पोलीस तपासणीकरिता पाठविणार आहेत. दरम्यान, शिरजगाव पोलिसांनी अचलपूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल बाधित मुलींचे बयाण नोंदविले आहे.

एसडीओंकडून जिल्हाधिकाऱ्यांना माहिती
पंचशील आदिवासी आश्रम शाळेतील मुलींना झालेल्या विषबाधा प्रकरणाची माहिती अचलपूरचे एसडीओ संदीप कुमार अपार यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिली आहे. तर नायब तहसीलदार अक्षय मांडवे यांनी उपजिल्हा रुग्णालयाला भेट देऊन विषबाधा प्रकरणाची माहिती जाणून घेतली.
अतिरिक्त वाॅर्ड सज्ज 
औषधोपचाराकरिता दाखल बाधित मुलींचे एका स्वतंत्र वाॅर्डात व्यवस्था करण्यात आली आहे. यादरम्यान बाधित विद्यार्थ्यांची संख्या वाढल्यास येणाऱ्या विद्यार्थ्याला योग्य तो औषधोपचार तत्काळ मिळावा म्हणून एक अन्य वाॅर्ड अतिरिक्त बेडसह सज्ज ठेवण्यात आला असल्याची माहिती अचलपूर उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुरेंद्र ढोले यांनी सांगितले. विषबाधेचे नेमके कारण सध्या सांगता येणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

शिक्षक रुग्णालयात
पंचशील आदिवासी आश्रमशाळेतील बाधित विद्यार्थिनींच्या आरोग्याबाबत शाळेतील शिक्षकही काळजी घेत आहेत. अचलपूर उपजिल्हा रुग्णालयासहजिल्हा रुग्णालयात वसतिगृह अधीक्षकासह शाळेतील शिक्षक रुग्णालयात उपस्थित आहेत.

 

Web Title: 34 girls of Karanja Bahiram's Panchsheel tribal ashram school were poisoned

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.