पहिली ते दहावीचे ३४३२२ विद्यार्थी झाले गायब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2020 04:13 AM2020-12-22T04:13:02+5:302020-12-22T04:13:02+5:30

प्रशासनाचे दुर्लक्ष : झेडपीचे मिशन ‘निरंक ड्रॉप बॉक्स’ अमरावती : पुढल्या वर्गात जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या गतवर्षापेक्षा कमी आढळल्यास, ...

34322 students of class I to X disappeared | पहिली ते दहावीचे ३४३२२ विद्यार्थी झाले गायब

पहिली ते दहावीचे ३४३२२ विद्यार्थी झाले गायब

Next

प्रशासनाचे दुर्लक्ष : झेडपीचे मिशन ‘निरंक ड्रॉप बॉक्स’

अमरावती : पुढल्या वर्गात जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या गतवर्षापेक्षा कमी आढळल्यास, या गळतीच्या प्रक्रियेला ‘ड्रॉप बॉक्स’ संबोधिले जाते. जिल्ह्यातील शैक्षणिक सत्र २०१९-२० मध्ये १० हजार ४२३ मुले व सत्र २०२०-२१ मध्ये २३ हजार ८९९ अशी दोन वर्षांमध्ये एकूण ३४ हजार ३२२ मुले ही ‘ड्रॉप बॉक्स’मध्ये आहेत. ‘ड्रॉप बॉक्स’मधील या मुला-मुलींचा शोध घेण्यासाठी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने कामाला सुरुवात केली आहे.

विद्यार्थीनिहाय माहिती कशी काढावी, शाळाबाह्य मुलांची सांख्यिकी माहिती, उपाययोजना, नियोजन व केस स्टडी लिहण्याची पद्धत, बालरक्षक नोंदणी लिंक व टास्क लिंक यावर सखोल माहिती देऊन यंत्रणा कामाला लागली आहे. प्रत्येक मूल शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी बालरक्षकांची चळवळ उभी करण्यात आली आहे. बालरक्षकांमध्ये आत्मीयता व सहानुभूतीची आवश्यकता आहे. याकरिता सूक्ष्म नियोजन केल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.

बॉक्स

प्रशासन-पालकांच्या दुर्लक्षामुळे गळती

स्थलांतरित होणाऱ्या पालकांमुळे मुले शिक्षणापासून वंचित राहतात. पाेटाची खळगी भरण्यासाठी या गावातून त्या गावात जाणारे पालक आपल्या पाल्यांना शाळेत टाकत नाहीत. शाळेत टाकले तरी ते नियमित नसतात. अशा मुलांचा शोध शिक्षण विभाग घेत नाही.

बॉक्स

जिल्ह्यातील विद्यार्थी

अचलपूर ८६८

१६५४

अमरावती ५४४

११८८

मनपा ३४१३

८८८१

अंजनगाव ६५९

१३८८

भातकुली २१३

६९१

चांदूर बाजार ६४७

१४६०

चांदूर रेल्वे १६३

४९९

चिखलदरा ६७४

१४५६

दर्यापूर ४०१

७८५

धामणगाव १३१

५४३

धारणी १०८९

२३३१

मोर्शी ३६८

८९०

नांदगाव २८१

७५६

तिवसा २७५

२२९

वरूड ६९७

८९८

कोट

ड्राॅप बॉक्समधील विद्यार्थी संख्या निरंक करण्यासाठी शाळाबाह्य मुले, शाळेतून जाणारी मुले, सतत गैरहजर राहणारी मुले यांचा शोध घेण्यात येत आहे. वस्ती, तांडे, वीट्टभट्टी, कारखाने, भटकंती करून विविध व्यवसाय करणाऱ्यांच्या झाेपड्यांना भेटी देऊन बालरक्षक मुलांचा शोध घेत आहेत.

ई.झेड. खान, शिक्षणाधिकारी (प्राथमिक)

Web Title: 34322 students of class I to X disappeared

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.