मराठी प्राध्यापक परिषदेचे ३४ वे अधिवेशन गुरुवारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 04:14 AM2021-04-28T04:14:56+5:302021-04-28T04:14:56+5:30

आभासी पद्धतीने आयोजन, अमरावती विद्यापीठाचे कुलगुरूंच्या हस्ते अधिवेशनाचे उद्‌घाटन अमरावती : मराठी प्राध्यापक परिषदेचे ३४ वे अधिवेशन आभासी पद्धतीने ...

34th session of Marathi Professors' Council on Thursday | मराठी प्राध्यापक परिषदेचे ३४ वे अधिवेशन गुरुवारी

मराठी प्राध्यापक परिषदेचे ३४ वे अधिवेशन गुरुवारी

Next

आभासी पद्धतीने आयोजन, अमरावती विद्यापीठाचे कुलगुरूंच्या हस्ते अधिवेशनाचे उद्‌घाटन

अमरावती : मराठी प्राध्यापक परिषदेचे ३४ वे अधिवेशन आभासी पद्धतीने २९ एप्रिल रोजी होणार आहे. या कार्यक्रमाचे आयोजक चिखली येथील शि.प्र.मं. तात्यासाहेब महाजन कला व वाणिज्य महाविद्यालय आहे.

अधिवेशनाचे उद्घाटन सकाळी १० वाजता कुलगुरू मुरलीधर चांदेकर करतील. कार्यक्रमाचे अध्यक्ष रामकृष्ण शेटे राहतील. अधिवेशनाचे अध्यक्ष प्राचार्य गजानन जाधव हे असतील. मराठी प्राध्यापक परिषदेचे अध्यक्ष प्राचार्य पवन मांडवकर व स्वागताध्यक्ष प्राचार्य सुभाष गव्हाणे आहेत. या कार्यक्रमाचे संचालन अधिवेशनाचे आयोजक समन्वयक सिनेट तथा व्यवस्थापन परिषद सदस्य प्रफुल्ल गवई करतील. आभार गजानन मुंडे मानतील. या अधिवेशनात विद्यार्थीच्या अडचणी, अभ्यासक्रम, परीक्षा आदी विषयांवर चर्चा होणार असून, उद्घाटन संपल्यानंतर प्रथम सत्रात आभासी पद्धतीने ‘मराठीचे अध्ययन - एक समस्या व उपाय’ या विषयावर वक्ते म्हणून प्रमोद पवार (गोवा विद्यापीठ) हे विचार व्यक्त करतील. या सत्राच्या अध्यक्षस्थानी मराठी अभ्यास मंडळाच्या अध्यक्ष ममता इंगोले राहतील. संचालन गोविंद गायकी व आभार प्रदर्शन विजय वाकोडे करतील.

दुसरे सत्र ‘कोविडकाळात परीक्षेची आवश्यकता व कार्यपद्धती’ या विषयावर वक्ते म्हणून संजय करंदीकर (महाराजा सयाजी विद्यापीठ, बडोदा) हे प्रकाश टाकतील. अध्यक्षस्थान अलका गायकवाड भूषवतील. संचालन विलास भवरे करतील. आभार सुवर्णा गाडगे मानतील.

समारोपीय सत्रात मनोज तायडे हे मनोगत व्यक्त करतील. या कार्यक्रमाचे अध्यक्ष शि.प्र.मं. चे सचिव प्रेमराज भाला राहतील. या अधिवेशनात नोंद करून सहभागी होण्याचे आवाहन आयोजक प्राचार्य सुभाष गव्हाणे, प्रफुल्ल गवई, पवन मांडवकर, राजू आदे व आयोजन समिती सदस्य केदार ठोसर, प्रदीप बारड, विजय वाकोडे, बाळकृष्ण इंगळे, नागेश गायकवाड यांनी केले आहे.

Web Title: 34th session of Marathi Professors' Council on Thursday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.