अमरावती विभागात खरिपाची ३५ टक्के पेरणी (सुधारित)
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2021 04:10 AM2021-06-24T04:10:37+5:302021-06-24T04:10:37+5:30
पश्चिम विर्दभात जून महिन्यात आतापर्यंत सरासरी १६८.३ मिमी पाऊस झाला आहे. मात्र, यात सातत्य नाही. सर्वाधिक २३७.९ मिमी पाऊस ...
पश्चिम विर्दभात जून महिन्यात आतापर्यंत सरासरी १६८.३ मिमी पाऊस झाला आहे. मात्र, यात सातत्य नाही. सर्वाधिक २३७.९ मिमी पाऊस यवतमाळ जिल्ह्यात झाल्याने ५६ टक्क्यांवर क्षेत्र, सर्वात कमी ७२ मिमी पाऊस अकोला जिल्ह्यात झाल्याने फक्त १० टक्के क्षेत्रातच पेरणी आटोपली आहे. याशिवाय बुलडाणा जिल्ह्यात ११८.७ मिमी पाऊस झाला व २९.२ क्षेत्रात पेरणी आटोपली आहे. वाशिम जिल्ह्यात १९५ मिमी पाऊस व ५४ टक्के क्षेत्रात पेरणी तसेच अमरावती जिल्ह्यात १७४.५ मिमी पाऊस व २२.४ टक्के क्षेत्रात पेरणी आटोपली.
विभागात यंदाच्या खरिपासाठी ३२,२८,५०० हेक्टर क्षेत्र प्रस्तावित होते. यापैकी ११,५३,९०० हेक्टरवर सोमवारपर्यंत पेरणी आटोपली आहे. यात सर्वाधिक ४,७३,३०० हेक्टरवर कपाशीची पेरणी झाली. ही ४७.९ टक्केवारी आहे, तर ५,०७,८०० हेक्टरमध्ये सोयाबीनची पेरणी झाली. ही ३३.९ टक्केवारी आहे. मृगात पावसाने ओढ दिल्याने आर्द्रा नक्षत्रातच पेरण्या आटोपण्याची शक्यता आहे.