अमरावती जिल्ह्यात अतिवृष्टीचे ३५ बळी; ३.५२ लाख हेक्टर बाधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2022 08:03 PM2022-07-26T20:03:44+5:302022-07-26T20:04:21+5:30

Amravati News अमरावती विभागात आपत्तीमुळे १ जूनपासून ३५ नागरिकांचा मृत्यू व अतिवृष्टीमुळे ३.५२ लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे.

35 victims of heavy rain in Amravati district; 3.52 lakh hectares affected | अमरावती जिल्ह्यात अतिवृष्टीचे ३५ बळी; ३.५२ लाख हेक्टर बाधित

अमरावती जिल्ह्यात अतिवृष्टीचे ३५ बळी; ३.५२ लाख हेक्टर बाधित

googlenewsNext
ठळक मुद्देनदी-नाल्यांच्या पुरामुळे ३२१ गावातील ५,५३२ व्यक्ती स्थलांतरित

अमरावती : विभागात आपत्तीमुळे १ जूनपासून ३५ नागरिकांचा मृत्यू व अतिवृष्टीमुळे ३.५२ लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. १३ तालुक्यात ३२१ गावांमधील ३,१६४ कुटुंब व ६,२८० व्यक्ती बाधित झाल्या आहेत. याशिवाय ५,५३२ नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आल्याचा विभागीय उपायुक्तांचा अहवाल आहे.

आपत्तीमध्ये अमरावती जिल्ह्यात १२, यवतमाळ ९, अकोला ४, वाशिम ४ व बुलडाणा जिल्ह्यात ६ जणांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय ३४ नागरिक गंभीर जखमी झाले आहेत. यामध्ये यवतमाळ जिल्ह्यात १२ जण आहेत. २८ मृतांच्या वारसांना १.१२ कोटींची मदत देण्यात आली. अतिवृष्टीमुळे यवतमाळ जिल्ह्यातील १० तालुके बाधित झाले आहेत. अमरावती जिल्ह्यातील २,३०३, यवतमाळ ३,१६१ अशा एकूण ५,५३२ नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे.

जुलै महिन्यात वर्षभराच्या तुलनेत ५० टक्के पाऊस झाला. जूनपासून आतापर्यंत ३४८.६ मिमी. सरासरी अपेक्षित असताना प्रत्यक्षात ४८३.३ मिमी. पावसाची नोंद झाली आहे. ही टक्केवारी १३८.८ आहे. पाचही जिल्ह्यात पावसाची सरासरी पार झालेली आहे. यादरम्यान चार वेळा अतिवृष्टीची नोंद झाली. ४ जुलैपासून सुरु झालेली पावसाची रिपरिप अद्याप थांबलेली नसल्याने प्रकल्प ओव्हरफ्लो झालेत व नदी - नाल्यांना पूर आल्याने सर्वाधिक नुकसान झाले आहे.

३.४६ लाख हेक्टरमध्ये ३३ टक्क्यांवर नुकसान

अतिवृष्टीमुळे ३,४६ लाख हेक्टरमध्ये शेतीचे ३३ टक्क्यांवर नुकसान झाले आहे. यामध्ये अमरावती जिल्ह्यात १,३२,२६३ हेक्टर, यवतमाळ १,३४,७३५, अकोला ७२,०३६, वाशिम २१ व बुलडाणा जिल्ह्यात ७,००४ हेक्टर बाधित झालेले आहे. याशिवाय ३,७४५ हेक्टरमध्ये पुरामुळे गाळ साचला आहे तर नदी-नाल्यांना आलेल्या पुरात २,२३१ हेक्टर शेती खरडून गेली आहे.

१९० जनावरे मृत, ७,२२० घरांची पडझड

आपत्तीमध्ये लहान - मोठ्या १९० जनावरांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये दुधाळ ७३, लहान ६२ व ओढकाम करणारी ७ जनावरे मृत झाली, याशिवाय ३५९ पक्क्या व ६,८६४ कच्च्या अशा एकूण ७,२२० घरांची पडझड झालेली पडझड झाली आहे. ९१ गोठ्यांचेदेखील नुकसान झालेले आहे. पाऊस सुरु असल्यामुळे पंचनाम्याची गती मंदावली आहे.

Web Title: 35 victims of heavy rain in Amravati district; 3.52 lakh hectares affected

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :floodपूर