‘ते‘ ३.५० कोटी गुजरातच्या कृषी व्यवसायिकाचे !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2021 04:13 AM2021-07-29T04:13:35+5:302021-07-29T04:13:35+5:30
२७ जुलै रोजी पहाटे राजापेठ पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशनदरम्यान फरशी स्टॅाप परिसरात दोन चारचाकी वाहनातून तब्बल ३ कोटी ५० लाख ...
२७ जुलै रोजी पहाटे राजापेठ पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशनदरम्यान फरशी स्टॅाप परिसरात दोन चारचाकी वाहनातून तब्बल ३ कोटी ५० लाख रुपये जप्त केले होते. प्रथमदर्शनी ती रक्कम हवाल्याचे असल्याचा निरिक्षण पोलिसांनी नोंदविले होते. रोकडसह दोन चारचाकी वाहने व सहा जणांना राजापेठ पोलिसांनी मंगळवारी सकाळपासून ताब्यात घेतले. त्यानंतर सीआरपीसीच्या कलम ४१/१ नुसार त्यांची चौकशी सुरू केली. मोाबईल लोकेशन व सीडीआरमधून ती रक्कम गुजरातहूूून अमरावतीमार्ग पुढे जाणार होती.
सीए, वकील पोलिसांच्या पुढ्यात
सीए मयुर मधुकर शहा हे बुधवारी दुपारी ‘बाय प्लेन’ अमरावतीत दाखल झाले. सोबतीला वकील मनोज मिश्रा यांना घेऊन ते राजापेठ पोलीस ठाण्यात दाखल झाले. ती संपुर्ण रक्कम अहमदाबाद येथील कृषी व्यवसायाशू निगडित असलेल्या कमलेश शहा यांची असून, ती रक्कम वैध आहे. त्याबाबतचा संपुर्ण व्यवहाराचा वैध दस्तावेज आपल्याकडे असल्याचा दावा त्यांनी केला. मात्र, ती रक्कम न्यायालयाच्या आदेशानेच आपल्याला देता येईल, अशी भूमिका राजापेठचे ठाणेदार मनीष ठाकरे यांनी घेतली.
३.३४ कोटी चालले होते औरंगाबादला
पोलिसांनी दोन चारचाकी वाहने जप्त केली. यातील एमएच २० डीव्ही ५७७४ या वाहनातून ३ कोटी ३४ लाख रुपये अमरावतीहून मुंबईला, तर एमएच १८ बीआर १४३४ या वाहनातून १६ लाख रुपये अमरावतीहूनच औरंगाबादला घेऊन जात असल्याची कबुली चार चालकांनी दिली. तर, जप्त ३.५० कोटी रुपये अमरावतीच्या फरशी स्टॉपमधील एका फ्लॅटमधूनच वाहनात भरल्याचे आतापर्यंतच्या चौकशीत समोर आले आहे. येथील फ्लॅटमधून ज्या निलेश पटेल व जिग्नेश गिरीगोसावी यांना ताब्यात घेतले, त्यांनीच तो पैसा पुढे पाठविण्याची जबाबदारी घेतली होती, मात्र, त्यांच्याकडे ती रक्कम नेमकी कुठून आली, हे अनुत्तरित आहे.