पश्चिम विदर्भातील प्रकल्पांकरिता ३५ हजार हेक्टर शिल्लक तीन वर्षांत भूसंपादनाचे नियोजन

By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2019 05:17 PM2019-02-24T17:17:34+5:302019-02-24T17:19:26+5:30

जिगाव प्रकल्पाकरिता १२ हजार हेक्टर  

35,000 hectares left for projects in western Vidarbha, land acquisition planning in three years | पश्चिम विदर्भातील प्रकल्पांकरिता ३५ हजार हेक्टर शिल्लक तीन वर्षांत भूसंपादनाचे नियोजन

पश्चिम विदर्भातील प्रकल्पांकरिता ३५ हजार हेक्टर शिल्लक तीन वर्षांत भूसंपादनाचे नियोजन

googlenewsNext

संदीप मानकर 

अमरावती : एसीबी चौकशीत अडकलेले तसेच पश्चिम विदर्भातील इतरही अनेक प्रकल्पांकरिता एकूण ३५३८६.६५ हेक्टर भूसंपादन शिल्लक आहे. यामध्ये अनुशेषांतर्गत प्रकल्पांकरिता १४२९५.९४ हेक्टर तर अनुशेषबाह्य प्रकल्पाकरिता २१०९०.७१ हेक्टर भूसंपादन अद्यापही शिल्लक आहे. शासनस्तरावर त्याची प्रक्रिया सुरू आहे. यामध्ये अंतिम टप्प्यात प्रस्ताव सादर झालेले क्षेत्र सरळ खरेदीद्वारे ७२५.४४ हेक्टर आहे, तर प्रक्रियेव्दारे ३६६७.८१ हेक्टर आहे. उर्वरित भूसंपादन प्रक्रिया प्राथमिक  स्तरावर आहे. अद्याप २७३३.१२ हेक्टरचा प्रस्तावच सादर झाले नसल्याची बाब पुढे आली आहे. सदर भूसंपादन प्रक्रिया राबविताना कुठलाही गैर प्रकार होऊ नये याकरिता शासन करडी नजर ठेवणार आहे.   

सर्वाधिक १२ हजार हेक्टर भूसंपादन बुलडाणा जिल्ह्यातील जिगाव प्रकल्पाकरिता करावे लागणार आहे. ही भूसंपादनाची प्रक्रिया युद्धस्तरावर सुरू आहे. अमरावती जिल्ह्यातील मोठा प्रकल्प असलेल्या अप्पर वर्धाकरीता २५९ हेक्टर भूसंपादन शिल्लक असून, त्यासंदर्भाचा प्रस्ताव क्षेत्रस्तरावर सादर करण्यात आला आहे. यामध्ये अनुशेषांतर्गत मध्यम प्रकल्पाकरिता ६२४ हेक्टर भूसंपादन शिल्लक आहे. त्याची भूसंपादन प्रक्रिया सुरू असल्याची माहिती जलसंपदा विभागाच्या अधिकाºयांनी दिली. लघुप्रकल्पाकरिता २०१ हेक्टर भूसंपादन करण्यात येणार आहे. असे एकूण १०८५ हेक्टरचे भूसंपादन शिल्लक आहे. अनुशेषाबाह्य मोठे, मध्यम व लघू असे एकूण ५६५ हेक्टर भूसंपादन शिल्लक असून, ३४० हेक्टर भूसंपादन प्रक्रियाद्वारे घेण्यात येणार आहे. निम्न पेढी हासुद्धा मोठा प्रकल्प असून, याकरिता भूसंपादन प्रक्रिया सुरू आहे. 

बुलडाण्यातील जिगाव या मोठ्या प्रकल्पाकरिता १२७७७.२१ हेक्टर भूसंपादन अद्यापही शिल्लक आहे. यामध्ये सरळ खरेदीने ३९.६१ हेक्टर, तर भूसंपादन प्रक्रियेव्दारे २९४५.८ हेक्टर करण्यात येणार आहे. त्याकरिता १२४४ हेक्टरचा प्रस्ताव क्षेत्रस्तरावर सादर करण्यात आला आहे. खडकपूर्णा प्रकल्पाचे ४९.९५ हेक्टर भूसंपादन शिल्लक आहे. लघुप्रकल्पाकरिता ९९ हेक्टर सर्वात कमी शिल्लक आहे. याच जिल्ह्यातील अनुशेषाबाह्य प्रकल्पांकरिता पेनटाकळी प्रकल्पाकरिता ८०.३९ हेक्टर भूसंपादन शिल्लक आहे. 

यवतमाळ जिल्ह्यात १९ हजार हेक्टर भूसंपादन शिल्लक 
जिल्ह्यतील अनुशेषाबाह्य प्रकल्प करण्यात येत आहेत. त्यामध्ये मोठ्या प्रकल्पाकरिता १७०८१.२३ हेक्टर, मध्यम प्रकल्पासाठी १४६७.१७ हेक्टर, तर लघु प्रकल्पासाठी ५८२.७४ हेक्टर असे एकूण १९१३१.१४ हेक्टर भूसंपादन अद्यापही शिल्लक असून सरळ सेवा खरेदीकरिता अंतिम टप्प्यात २४१.०१ हेक्टराचा प्रस्ताव सादर आहे. भूसंपादन प्रक्रियाद्वारे २३१.३४ हेक्टरचा प्रस्ताव सादर असून, १८४२०.७३ हेक्टर जमीन भूसंपादन प्रक्रियाद्वारे संपादित करण्यात येणार असून, त्याचे प्राथमिक टप्प्यात प्रस्ताव सादर आहेत.

अकोला जिल्ह्याच्या प्रकल्पाकरिता हवे ४६३ हेक्टर भूसंपादन
जिल्ह्यातील अनुशेषांतर्गत मध्यम प्रकल्पाकरिता ३४.७६ हेक्टर व लघुप्रकल्पासाठी ६०.७९ हेक्टर भूसंपादन शिल्लक आहे. अनुशेबाह्य लघुप्रकल्पाकरिता ३६३.१५ असे एकूण ४६३.७० हेक्टरचे भूसंपादन शिल्लक आहे. यापैकी ४१०.३१ हेक्टरचा प्रस्ताव सादर करण्यात आलेला नसल्याची बाब पुढे आली आहे. तर वाशिम जिल्ह्यातील प्रकल्पांकरीता अनुशेषांतर्गत व अनुशेषबाह्य असे एकूण ६४३.६३ हेक्टर भूसंपादन शिल्लक आहे. या जिल्ह्यात सरळ सेवा खरेदीने ५५०९ हेक्टर लघु प्रकल्पांकरीता भूसंपादन करण्यात आले होते असे जलसंपदा विभागाच्या अहवालात स्पष्ट झाले आहे.

शिल्लक असलेले भूसंपादन पुढील तीन वर्षांत संपादित करण्याचे नियोजन आहे. त्याकरिता भूसंपादन कायद्याने तसेच सरळसेवा खरेदीने भूसंपादन करण्याची प्रक्रिया शासनाच्या आदेशानुसार राबविण्यात येणार आहे. 
- रवींद्र लांडेकर, मुख्य अभियंता जलसंपदा विभाग अमरावती
 

Web Title: 35,000 hectares left for projects in western Vidarbha, land acquisition planning in three years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.